we work for supriya sule : Thopate | Sarkarnama

आम्ही तर मावळे; दिलेल्या शब्दानुसार सुप्रिया सुळे यांचेच काम केले : थोपटे

विजय जाधव
गुरुवार, 16 मे 2019

भोर ः लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भोर तालुक्यातील कॉग्रेसने आघाडीचा धर्म पाळलेला असून सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळणार असल्याचे भोरमधील कॉग्रेसचे सर्वेसर्वा आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

मतमोजणीनंतर तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय मतदानातून याची खात्री करता येईल. आम्ही शिवरायांचे मावळे असून दिलेल्या शब्दाचे आम्ही प्रामाणिकपणे पालन केलेले आहेच. तालुक्यातील इतर कोणत्याही पक्षाच्या पदाधिका-यांनी केलेल्या गोष्टींचे खापर कॉग्रेसवर फोडणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी `कमळ` चालविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे येथे नक्की कोणाला मताधिक्य मिळणार याची उत्सुकता आहे. याबाबत थोपटे यांनी आपण आघाडीशी प्रामाणिक असल्याचा दावा केला.

ते म्हणाले,`` भोर पंचायत  समितीवर आणि जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या गट व गटनिहाय टक्केवारीवरून कोणी किती प्रामाणिकपणे काम केलेले आहे, हे लक्षात येईल.  आम्ही आघाडीच्या धर्माचे पालन करणार असल्याचे प्रचार सभांमधून आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेतही जाहीर केलेले होते. त्यामुळे पुन्हा-पुन्हा यावर चर्चा करणे योग्य नाही. कॉग्रेसच्या सर्व पदाधिका-यांनी कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळलेला आहे.

स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांमधील काही चांगल्या-वाईट गोष्टींचा प्रभाव हा इतर निवडणुकींवर पडत असतो. हे लक्षात घ्यायला हवे. शेवटी मतदार हा त्यांच्या विचाराप्रमाणेच मतदान करीत असतो. परंतु सर्वच गोष्टींचे खापर आमच्यावर फो़डले जाते. मताधिक्य वाढले ते कोणामुळे वाढले आणि कमी झाले तर तेही कोणामुळे याबाबत योग्य माहिती घेऊन खुलासा करावा लागेल, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख