एकनाथ खडसे यांची इच्छा असेल तर त्यांचे राष्ट्रवादीत स्वागतच : अजित पवार

एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांनी इच्छा प्रदर्शित केली तर त्यांचे राष्ट्रवादीत स्वागतच करू, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यानी पत्रकारांशी बोलताना येथे केले. आपल्या मंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
We Will Welcome Ajit Pawar in NCP Say Ajit Pawar
We Will Welcome Ajit Pawar in NCP Say Ajit Pawar

पुणे : एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांनी इच्छा प्रदर्शित केली तर त्यांचे राष्ट्रवादीत स्वागतच करू, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यानी पत्रकारांशी बोलताना येथे केले. आपल्या मंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

एकनाथ खडसेंच्या नाराजीबाबत विचारले असता पवार यांनी वरील प्रमाणे मत व्यक्त केले. फडणवीस तुम्हाला त्या बंडावरून खलनायक ठरवू पाहताहेत याबाबतची प्रतिक्रिया विचारली असता, 'नो काॅमेंट्स मला चिडायला लावू नका,'' असे उत्तर त्यांनी दिले. पंकजा मुंडेंची नाराजी हा भाजपचा पक्षांतर्गत प्रश्न असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

नागपूर अधिवेशनात राजकीय भूकंप होणार आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते व राज्याचे मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. त्याबाबत आपल्याला काही माहिती नाही, असा दावा पवार यांनी केला. राष्ट्रवादीला गृह खाते मिळणार का या प्रश्नावर तो निर्णय पवारसाहेब आणि मुख्यमंञी उद्धवजी मिळून घेतील, असे पवार म्हणाले. भाजप सेनेला पुन्हा ऑफर देते आहे याबाबत विचारले असता, ''देऊ देत ना, तो त्यांचा प्रश्न आहे. सध्या शिवसेना आमच्यासोबत आहे एवढंच सांगेन, असे अजित पवार म्हणाले.

महापालिका निवडणुकीतील प्रभाग पद्धत बदलणार का या प्रश्नावर, आघाडी मिळून त्यावर निर्णय होईलअसे पवार म्हणाले. माझ्या मंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय पवार साहेबच घेतील, खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com