निवडणूक गेली चुलीत, हर्षवर्धनला धडा शिकवू :  चंद्रकांत खैरे

..
harshawardhan jadhav chandrakant khaire
harshawardhan jadhav chandrakant khaire

औरंगाबादः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर कुणी खालच्या पातळीला जाऊन टिका करत असेल, आमच्या मॉं साहेबांबद्दल अपशब्द काढत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. निवडणुक गेली चुलीत, हर्षवर्धनला धडा शिकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा गर्भित इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून दिला. आता निवडणूक न लढवता लंडनमध्ये पळून जावे असा माझा त्यांना सल्ला आहे अशा शब्दांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांना सुनावले.

कन्नड विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेत माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसैनिकांना उद्देशून वादग्रस्त आणि संतापजनक विधान केले होते. त्याचे पडसाद आज दुसऱ्या दिवशी उमटले. बुधवारी मध्यरात्री जाधव यांच्या समर्थनगर येथील घरावर हल्ला झाला, त्यात त्यांच्या कारची मोडतोड झाली. हा हल्ला शिवसेनेनेच केला असा आरोप जाधव यांनी केला.

या प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी बोलतांना चंद्रकांत खैरे यांनी संताप व्यक्त केला. खैरे म्हणाले, हर्षवर्धन जाधव ज्या पक्षात जातो, त्या पक्षाच्या नेतृत्वाबद्दल असभ्य भाषेत बोलतो. इतर पक्ष ते खपवून घेतील, पण शिवसेना आणि पक्षप्रमुखांबद्दल वेडवाकडं बोललेलं आम्ही कधीच खपवून घेणार नाही. सायकीक आणि वात्रटपणांच हे लक्षण आहे. भ्याड, नामर्दासारखा शिवसेनेने हल्ला केला हा त्यांचा आरोप चुकीचा आहे. आम्ही भ्याडपणे हल्ला करत नाही, समोरासमोर लढण्याची आमच्यात धमक आहे.

निवडणुक असल्यामुळे शिवसैनिक शांत आहेत, पण त्याने अशीच बडबड सुरू ठेवली तर निवडणूक गेली चुलीत त्याला धडा शिकवायला मी स्वःत समोर जाईन असा इशाराही खैरे यांनी दिला. त्यांनी आता लंडनला पळून जावं, इथे थांबू नये असा सल्ला देखील खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com