उमेदवार कोणीही असो पण बीड लोकसभेत गुलाल आमचाच : अमरसिंह पंडित यांचा विश्वास

उमेदवार कोणीही असो पण बीड लोकसभेत गुलाल आमचाच : अमरसिंह पंडित यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुकांच्या यादीत नाहीत. मात्र, शरद पवारांनी आदेश दिला तर निवडणुक लढवू. उमेदवार कोणीही असला तरी बीडमध्ये गुलाल आमचाच असेल.- अमरसिंह पंडित, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस.

बीड : बटन दाबून केंद्र आणि राज्यात सरकार निवडून देणारा शेतकरी दुष्काळामुळे चिंतेत असताना सरकारकडे कसलेही नियोजन नाही. सामान्य जनता सरकार विरोधात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत गुलाल आमचाच असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी येथे व्यक्त केला. आपण इच्छुक उमेदवारांच्या यादीत नसून जर, शरद पवारांनी आदेश दिला तर निवडणुक लढवू असा खुलासाही त्यांनी केला. पण, उमेदवार कोण यापेक्षा कोणीही उमेदवार असला, तरी गुलाल आमचाच असेल असेही पंडित म्हणाले.

सरकारला चार वर्षे पुर्ण होत असल्याने आता राज्यकर्ते स्वत:च पाठी थोपटून घ्यायला सुरु करतील. पण, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिले. ते म्हणाले, "भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शेकडो बैठका झाल्या तरी अद्याप आरक्षण मिळाले नाही. मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असाच मागे पडला आहे. न्यायालयाची स्थगिती नसतानाही आरक्षणाला जाणिवपूर्वक स्थगिती दिली. मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप गुन्हेही मागे घेतले नाहीत आणि तशा काही हालचालीही नाहीत," जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून सरकारने कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर कराव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी दिले.

"हमीभाव केंद्र अद्याप सुरु नाहीत. मागच्या हंगामात खरेदी केलेल्या तुरीचे पैसे अद्याप भेटले नाहीत. सरकार शेतकऱ्यांना ऑलनाईनचा आग्रह धरत आहे. मात्र, सुविधा उपलब्ध आहेत का, याचाही सरकारने विचार करावा. तसा, सरकार आणि शेतीचा काहीही संबंध नाही. तरीही शेतकऱ्यांसाठी काय, केले याचा हिशोब द्यावा. सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्यात टंचाई निवारणाचे कुठलेही नियोजन नाही," असेही ते म्हणाले. 

जायकवाडीच्या पाण्याबाबत लोकप्रतिनिधी गप्प का, बसतात असा सवालही पंडित यांनी केला. जायकवाडी धरणाच्या पाण्यावर गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यातील ४१ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबीत आहे. पाणी वाटपाचे फेरनियोजन चुकीचे असल्याचे पंडित म्हणाले. प्रदेश उपाध्यक्षा उषा दराडे, माजी आमदार सय्यद सलिम, संदीप क्षीरसागर, डी. बी. बागल आदी यावेळी उपस्थित होते. 

हिशोबाला समोरा समोर बसू
चार वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय, केले याचा हिशोब जिल्ह्यातील भाजपने द्यावा. पुणे, मुंबई, रशियाच्या गप्पा मारु नयेत. नेहमीप्रमाणे आमच्या पंधरा वर्षांचा हिशोब हवा असेल तर त्यासाठी स्वतंत्र समोरा - समोर बसू असे आव्हान त्यांनी दिले.


*#सरकारनामा होऊ दे चर्चा!*
राजकारणाची आजची दशा सांगणारा आणि उद्याची दिशा ठरवणारा #सरकारनामा.. प्रत्येकाच्या संग्रही असावा असा राजकीय दस्तावेज!
आजच जवळच्या विक्रेत्याकडं संपर्क साधा.. अंक Amazon.in वरही उपलब्ध आहे..\ #नातंशब्दांशी 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com