कर्जत-जामखेडमध्येजे घडेल ते मॉडेल ठरेल : आमदार पवार - We will set Karjat- Jamkhed pattern for development | Politics Marathi News - Sarkarnama

कर्जत-जामखेडमध्येजे घडेल ते मॉडेल ठरेल : आमदार पवार

सरकारनामा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

..

जामखेड  : जे बारामतीत घडले ते 'बारामती मॉडेल' झाले. कर्जत-जामखेडमध्ये जे घडेल ते कर्जत-जामखेडचे 'मॉडेल' ठरेल, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

जामखेड येथे स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रेय जनार्धन तथा भाई फुटाणे प्रतिष्ठानतर्फे आयोजित संत नामदेव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. आमदार लहू कानडे, माजी आमदार रामदास फुटाणे, प्रतिष्ठानचे सचिव गजानन फुटाणे, कवी प्रशांत मोरे, अशोक नायगावकर उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, की मतदारसंघात विकासाची कामे करू. विकासकामांच्या योजनांचा सर्व्हे हाती घेतला आहे. सरकार स्थापनेसंदर्भात सुरू असलेल्या घडामोडींबाबत तिन्ही पक्षांचा कॉमन प्रोग्रॅम सुरू आहे, असे ते म्हणाले.

आमदार कानडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. माजी आमदार रामदास फुटाणे म्हणाले, की निवडणूक लढवून 'आमदार' होणारे लहू कानडे हे तिसरे साहित्यिक आहेत. यापूर्वी आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते. त्यांच्यानंतर विधान परिषदेत निवडून येण्याची संधी मला मिळाली. प्राचार्य भगवान देशमुख यांना संत नामदेव पुरस्कार दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख