भाजप आरामात बहुमत सिद्ध करील :  विखे 

सरकार आमचेच होणार याबाबत विश्‍वास होता. येत्या तीस तारखेला आम्ही आरामात बहुमत सिद्ध करू.आमदार राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishn_Vikhe_Patil
Radhakrishn_Vikhe_Patil

शिर्डी (नगर) : "आमचे सरकार स्थापन झाले, याचा आनंद वाटतो. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या जागा भाजपच्या पाठबळामुळे मिळाल्या होत्या, हे ते विसरले. महायुतीचा धर्म त्यांनी पाळला नाही. त्यांचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना आत्मपरीक्षण करावे लागेल. जनादेश मिळालेला भाजप हा सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे सरकार आमचेच होणार याबाबत विश्‍वास होता. येत्या तीस तारखेला आम्ही आरामात बहुमत सिद्ध करू,'' असा विश्‍वास माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज व्यक्त केला.


राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राजभवनात शपथ घेतल्यानंतर विखे पाटील यांनी पत्नी व जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्यासह साईसमाधीचे दर्शन घेतले. नगराध्यक्ष अर्चना कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन व नितीन कोते यांनी त्यांचे स्वागत केले. या दोघांनाही पेढे भरवून पदाधिकाऱ्यांनी भाजपचे सरकार स्थापन झाल्याचा आनंद साजरा केला. त्यानंतर विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते.


विखे पाटील म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढविण्यात आली. सर्वांत मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला जनादेश मिळाला. भाजपचेच सरकार येणार हे त्या वेळीच नक्की झाले होते. दरम्यानच्या काळात या घटना घडल्या. मात्र, जनादेश महायुतीच्या बाजूने होता. भाजपमुळे शिवसेनेला फायदा झाला. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.''

शिर्डीत जल्लोष
भाजपची सत्ता आली. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात जाऊन शपथ घेतली. त्यानंतर लगेचच येथील नगरपंचायत कार्यालयासमोर युवा नेते नितीन कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, ज्ञानेश्‍वर गोंदकर, सुजित गोंदकर आदींनी एकत्र येऊन फटाके वाजवले व पेढे वाटून आनंद साजरा केला. या वेळी नगराध्यक्ष अर्चना कोते उपस्थित होत्या. शहरातील चौकात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, मुकुंद मयूर, आकाश त्रिपाठी, चेतन कोते यांनी फटाके वाजवून व एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com