We will not join congress alliance if we get only Hatkangale : Raju Shetty | Sarkarnama

आम्हाला केवळ हातकणंगले देऊन आघाडी  होणार नाही : राजू शेट्टी 

संपत मोरे  
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

आम्ही  माढा, वर्धा, बुलढाणा,धुळे,सांगली,कोल्हापूर  या सात मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी केलीय.

-राजू शेट्टी

पुणे : "आम्ही केवळ हातकणंगले  मागत नाही,तो आमच्या हक्काचा मतदारसंघ आहे.तो दिला की आमची आघाडीशी युती झाली असं नाही, "असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ' सरकारनामा'शी बोलताना सांगितले . 

"आम्ही जिथं शंभर टक्के निवडून येणार आहोत तो मतदारसंघ सोडला की आम्ही आघाडीसोबत जाणार अस चित्र निर्माण झालं आहे. पण आम्ही  माढा, वर्धा, बुलढाणा,धुळे,सांगली,कोल्हापूर  या सात मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी केलीय.तिथं आमची ताकद आहे.यापैकी काही जागावर आमचा आग्रह आहे.या जागापैकी कोणत्या जागा हव्यात हे आम्ही आघाडीच्या बैठकीत सांगू."असे ते म्हणाले.

"हातकणंगले मतदारसंघात शेतकरी एकजुटीची शक्ती निर्माण झाली आहे.या एकजुटीमुळे तो मतदारसंघ आमचा बालेकिल्ला झाला आहे मग आमचाच मतदारसंघ आम्हाला  देणारे  हे कोण?" असा सवाल त्यानी केला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख