We will not forgive Rahul Gandhi for his Remarks on Sawarkar Say Devendra Fadanavis
We will not forgive Rahul Gandhi for his Remarks on Sawarkar Say Devendra Fadanavis

आम्ही देशभक्त आहोत, राहुल गांधींना माफ करणार नाही : देवेंद्र फडणवीस

सरकारने अधिवेशनाच्या तोंडावर मंत्र्यांना खातेवापट केले. ही खाती तात्पुरती असल्याचे त्यांचेच मंत्री सांगत आहेच. त्यामुळे अधिवेशनात कोणाला प्रश्‍न विचारायचे, कोण उत्तर देणार, दिलेल्या आश्‍वासनांच्या पूर्तीची जबाबदारी कोण घेणार असे असंख्य प्रश्‍न आहेत. तीन पक्षाचे सरकार असल्याने कोणाचाच पायपोस कोणात नसल्याचे स्पष्ट दिसून येते, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली

नागपूर : आम्ही गांधी आणि नेहरू यांना मानतो, म्हणून त्यांनी सावरकरांना मानावे, अशातला भाग नाही. तर क्रांतीची प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मान प्रत्येकाला ठेवावाच लागेल, असे देवेंद्र फडणवीस आज म्हणाले.

उद्यापासून येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यासाठी आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ''स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव असे स्वातंत्र्य सेनानी आहेत, की त्यांना दोन वेळा काळ्यापाण्याची शिक्षा झालेली आहे. 12-12 तास चाबकाचे फटके खात कोलू चालवण्याची शिक्षा त्यांनी भोगलेली आहे. बलिदानाची गाथा लिहिणारे, क्रांतीची प्रेरणा देणारे सावरकर राहुल गांधींना कळलेच नाही. म्हणूनच त्यांनी काल तसे वक्तव्य केले. तेव्हापासून सर्व देश त्यांचा निषेध करत आहे. कालपर्यंत सावरकरांना मानणारे आज सत्तेसाठी एवढे लाचार कसे काय झाले, याचे मला आश्‍चर्य वाटते,'' असेही फडणवीस म्हणाले. पत्रकार पत्रकार परिषदेला चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते, विनायक मेटे, महादेव जानकर, संजय कुटे आदी उपस्थित होते.

''सरकारने अधिवेशनाच्या तोंडावर मंत्र्यांना खातेवापट केले. ही खाती तात्पुरती असल्याचे त्यांचेच मंत्री सांगत आहेच. त्यामुळे अधिवेशनात कोणाला प्रश्‍न विचारायचे, कोण उत्तर देणार, दिलेल्या आश्‍वासनांच्या पूर्तीची जबाबदारी कोण घेणार असे असंख्य प्रश्‍न आहेत. तीन पक्षाचे सरकार असल्याने कोणाचाच पायपोस कोणात नसल्याचे स्पष्ट दिसून येते. फक्त हिवाळी अधिवेशनापूरती सरकारला वेळ मारून न्यायाची आहे,'' असाही आरोप फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या मित्रपक्षांनी शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार तर फळबागांना 50 हजार रुपये हेक्‍टरी मदत देण्याची मागणी केली होती. तिघांनीही वचननाम्यात सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. अवकाळी पावसामुळे 93 लाख हेक्‍टर शेतमालाचे नुकसान झाले असल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या मागणीनुसार 23 हजार कोटी रुपये भरपाईसाठी द्यावे लागणार आहे. तो निधी तत्काळ द्यावा. ही त्यांचीच मागणी आहे. विरोधीपक्ष म्हणून आम्ही त्यांना वारंवार स्मरण करू देऊ. सरकारने आपला शब्द पाळावा. सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या सरकारने या अधिवेशनात कर्ज माफीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशीही मागणी फडणवीस यांनी केली.''

महाराष्ट्राला ठप्प केले

''युतीच्या काळातील विकास कामांना स्थगिती देण्याचा सपाटा महाआघाडीच्या सरकारने लावला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ठप्प झाला आहे. गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. राज्याच्या विकासासाठी हे योग्य नाही. त्यांनी विकासकामांचा फेरआढावा घ्यावा. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र सुरू झालेली कामे बंद करू नये. सरकार कामे अधर्वट सोडून दिलेला निधी परत घेणार आहे का,'' असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

कर्जाची 'जगलरी'

महाराष्ट्राची आधिक स्थिती उत्तमच आहे. कर्ज काढण्याची मर्यादा शिल्लक आहे. मात्र आता दिलेले आश्‍वासन पाळता येत नसल्याचे राज्य कर्जबाजारी असल्याचा उलट्या बोंबा मारल्या जात आहेत. त्याकरिता अर्थसंकल्प व अर्थसंकल्पबाह्य कर्ज एकत्रित दाखवून दिशाभूल केली जात आहे. केवळ आकड्यांची जादू केली जात असल्याचाही आरोप फडणवीस यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com