मेणबत्त्या पेटवू; परंतु सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करा : खासदार फौजिया खान

देशाच्या अखंडतेसाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला आम्ही निश्चित प्रतिसाद देऊ, परंतु देशातील आपत्कालीन परिस्थितीत योगदान देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह गोरगरिबांना रेशन देऊन त्यांच्या प्रश्न प्राधान्याने मिटवावेत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी व्यक्त केली.
we will light candles but fulfil expectations of common man - Fouzia Khan
we will light candles but fulfil expectations of common man - Fouzia Khan

परभणी : देशाच्या अखंडतेसाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला आम्ही निश्चित प्रतिसाद देऊ, परंतु देशातील आपत्कालीन परिस्थितीत योगदान देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह गोरगरिबांना रेशन देऊन त्यांच्या प्रश्न प्राधान्याने मिटवावेत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी व्यक्त केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता देशातील सर्व लोकांनी घरातील लाईट बंद करून दरवाजे बाल्कन्या मध्ये येऊन मेणबत्ती पेटवावी, व देशाच्या अखंड तिचे उदाहरण द्यावे असे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान म्हणाल्या की, देशाच्या अखंडतेसाठी निश्चितच पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद देऊ, परंतु या आणीबाणीच्या काळात देशातील गोरगरीब आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरक्षितता देने हे देखील महत्त्वाचे आहे.

शुक्रवारी सकाळी पंतप्रधान देशाला संबोधित करणार असे समजल्यानंतर आम्ही मोठ्या अपेक्षेने त्यांच्या भाषणाकडे पाहत होतो. या संबोधनातून पंतप्रधान देशातील गोरगरीब कष्टकरी व कोणाशी फाइट करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत निश्चित मत मांडतील. अशी अपेक्षा होती. परंतु पंतप्रधानांनी त्यावर भाष्य केले नाही. पंतप्रधानांनी देशातील जनतेला मेणबत्त्या पेटविण्याचे आवाहन केले. परंतु ती मेणबत्ती विकत घेण्यासाठी देशातील गरीब जनतेकडे पैसे आहेत का ?  हा देखील मोठा प्रश्‍न असल्याचे फौजिया खान म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com