कसेही करून भाजपला 'वंचित' करायचे आहे : नितीन राऊत

काँग्रेस च्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महाराष्ट्रातील सत्ता स्थापन यावरून चर्चा झाली आणि कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही याबद्दल निर्णय झालेला आहे त्यामुळे लवकरच सत्ता महाराष्ट्र स्थापन होईल, असे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले.
Vidharbha Congress Leader Nitin Raut Wants BJP out of Power in Maharashtra
Vidharbha Congress Leader Nitin Raut Wants BJP out of Power in Maharashtra

नागपूर : काँग्रेस च्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महाराष्ट्रातील सत्ता स्थापन यावरून चर्चा झाली आणि कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही याबद्दल निर्णय झालेला आहे त्यामुळे लवकरच सत्ता महाराष्ट्र स्थापन होईल, असे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले.

राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला 24 तासांची मुदत दिली आहे. ती आज रात्री साडेआठ वाजता संपणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊन या सुरू असलेल्या पेचावर निर्णय होईल, असेही श्री राऊत यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे नेते सुद्धा त्यांच्या आमदारांशी चर्चा करून आज याबाबत निर्णय घेतील आणि काँग्रेसचे आमदार जरी जयपूरमध्ये असले तरीही आमचे त्या राज्यातील मुख्यमंत्री त्यांच्यासोबत आहेत आणि राष्ट्रीय नेत्यांची त्यांच्याशी चर्चा चालू आहे आज दिवसभरात चर्चेचे सर्व 17 आटपून संध्याकाळच्या पूर्वी निर्णय होईल, असा विश्वासही नितीन राऊत यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com