We Will Get Overwhelming Majority Claims Girish Mahajan | Sarkarnama

आम्हाला झेपणार नाही एव्हढे बहुमत गणपती बाप्पा देणार : गिरीश महाजन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

यंदाच्या विधानसभा निवडणूकीत आम्हाला झेपणार नाही एवढे बुहमत मिळेल.विरोधी पक्ष सैरभैर आहेत. त्यांचा ढोल फुटणार आहे, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केला.

नाशिक : यंदाच्या विधानसभा निवडणूकीत आम्हाला झेपणार नाही एवढे बुहमत मिळेल.विरोधी पक्ष सैरभैर आहेत. त्यांचा ढोल फुटणार आहे, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केला.

येथील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला मंत्री महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ झाला. यावेळी ते म्हणाले. ''गणपती आम्हाला पावलेला आहे. तो नेहेमीच चागंले काम करणा-यांच्या पाठीशी असतो. त्यामुळे यंदा त्याच्याकडे काहीही न मागता त्याने आम्हाला भरभरुन दिले आहे. लोकसभेच्या निकालापेक्षाही चांगला निकाल यावेळी विधानसभा निवडणुकीचा असेल. आम्हाला प्रचंड बहुमत मिळेल. झेपावणार नाही एव्हढे बहुमत मिळेल. विरोधी पक्ष सैरभैर झाले आहेत. ते सगळ्यांना दिसतेच आहे. त्यांचा यंदा ढोल वाजणारच नाही. त्यांचा ढोल फुटेल.''

यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार बाळासाहेब सानप, आणदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख