बिबट्यावर मंत्रालयात तोडगा काढू

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या घराजवळ बिबट्या आल्याने बिबट्याचा विषय अधिक चर्चेत राहिला. आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या विषयावर जिल्हा नियोजनच्या बैठकित चर्चा करून मंत्रालयात यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले.
we will find solution of leopard at mantralays says hasan mushrif
we will find solution of leopard at mantralays says hasan mushrif

नगर :  नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या घराजवळ बिबट्या आल्याने बिबट्याचा विषय अधिक चर्चेत राहिला. आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या विषयावर जिल्हा नियोजनच्या बैठकित चर्चा करून मंत्रालयात यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, डॉ. सुजय विखे पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, आशुतोष काळे व लहू कानडे आदी या वेळी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले,  ""बिबट्यांचे लोकवस्तीत येणे यावर प्रतिबंधासाठी उपाययोजना वन विभागाने कराव्यात. त्यासाठी अधिक पिंजरे घेण्यात यावेत.  जिल्ह्यातील बहुतांश भागात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.``

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शंभर कोटी अधिकचा निधीतून शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व संरक्षण, नवे विश्रामगृह, शाळाखोल्यांचे बांधकाम, रस्ते विकास आदींसाठी उपयोगात आणत आहोत. शाळाखोल्यांची दुरुस्ती आदींसाठी विविध निधीतून काम केले जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com