भाजपसोबत असलो तरीही स्वबळावर लढणार, महादेव जानकरांची घोषणा 

भाजपला मित्रपक्ष बरोबर असावे असे वाटत असले तरी जानकर यांनी मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपसोबत असलो तरीही स्वबळावर लढणार, महादेव जानकरांची घोषणा 

मुंबई : आम्ही भाजपसोबत असलो तरी महानगर पालिका, झेडपी, पंचायत समिती निवडणुका माझा पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचे रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी जाहीर केले आहे. 

राज्यात भाजपचे जे काही मित्र पक्ष आहेत त्यामध्ये रासपचा समावेश आहे. भाजपचा सर्वात जुना मित्र शिवसेनेने साथ सोडली आहे. हा पक्ष आता एनडीएतही नाही. भाजपला मित्रपक्ष बरोबर असावे असे वाटत असले तरी जानकर यांनी मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "" धनगर समाजाला आरक्षण मिळायला हवे अशी आमची मागणी आहे. धनगर समाजाला आदिवासी समाजप्रमाणे सवलत मिळायला हवी. भाजप सरकारने धनगर समाजसाठी निधीची तरतूद केली होती ती कायम ठेवावी.'' 

सरकारने आणलेल्याअहवालावर चर्चा करत आरक्षण मिळावे यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणीही त्यांनी केली. रासप भाजपसोबत असला तरीही स्थानिक स्वराज संस्थेत आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com