We will defeat BJP in next elections : Ganpatrao Deshmukh | Sarkarnama

येत्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ : गणपतराव देशमुख 

सरकारनामा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

आगामी 2019 च्या निवडणकीत मनुवादी विचारांचे भाजप सरकार हटवणार असून त्यांना त्यांची जागा दाखवून देवू असा इशारा शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी गुरुवारी (ता. 2) औरंगाबादेत आयोजित भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 17 व्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी दिला. 

औरंगाबादः आगामी 2019 च्या निवडणकीत मनुवादी विचारांचे भाजप सरकार हटवणार असून त्यांना त्यांची जागा दाखवून देवू असा इशारा शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी गुरुवारी (ता. 2) औरंगाबादेत आयोजित भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 17 व्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी दिला. 

काही माणसे राज्य करण्यासाठीच जन्माला येतात, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्त्वज्ञान सांगते. नेमके हेच शेकापला मान्य नाही. सर्व माणसाच्या जन्मानंतर त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होत असते. सध्या पुरोगामी विचारांची ताकद कमी असली तरी भाजप सरकारचा मनुवादी संस्कृती तयार करण्याचा डाव आम्ही येत्या निवडणुकीत उधळून लावू असेही देशमुख म्हणाले. 

समन्यायी पाणी वाटप म्हटले जाते पण कृष्णा खोऱ्याचा एक थेंबही मिळाला नाही, शेकाप येत्या काही दिवसात मराठवाड्याची मागासलेली पाणी स्थिती संपविण्यासाठी काम करेल असे आश्‍वान देखील त्यांनी यावेळी दिले. 

हमीभाव कागदावरच : जयंत पाटील 

शेतीमालाच्या हमीभावाची आश्‍वासने दिली जातात; पण ती कागदावरच राहतात, त्यासाठी कायदा करायला हवा अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशानात केली. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे; शिवाय धनगर आणि मुस्लिमांनाही आरक्षण मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतांनाच शेकाप नेहमीच मराठा समाजाच्या सोबत असल्याचा विश्‍वास त्यांनी उपस्थितांना दिला. 

सध्याचे सरकार कष्टकऱ्यांचे नसून परिवर्तनासाठी शेकापच्या प्रत्येक कार्यकर्त्याने झोकून देऊन काम करावे, असे आवाहन देखील जयंत पाटील यांनी केले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत मतभेद आहेत पण ते लोकशाही मानणारे आहेत. लोकशाही टिकली पाहिजे हीच शेकापची देखील भूमिका आहे. लोकशाही मार्गाने चालणाऱ्या समविचारी पक्षाच्या विचाराने परिवर्तन घडून येईल असा आशावादही यावेळी व्यक्त करण्यात आला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख