.. तर साखर कारखान्याचे कार्यालय पेटवून देऊ : महेश खराडे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळी खराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दिशेने पलूसला कडकनाथ कोंबडया भिरकावल्या होत्या.
mahesh-kharade Swabhimani shetkari sanghatana
mahesh-kharade Swabhimani shetkari sanghatana

पुणे -"जोवर उसाचा दर ठरत नाही तोवर कारखान्यांनी उसतोडी केल्या तर कारखान्याची कार्यालये पेटवली जातील," असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  नेते  महेश खराडे यांनी दिला आहे.

"महापुरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीही मदत केलेली नाही. शेतकरी सर्व बाजूनी अडचणीत आला आहे. त्याच्या उसाला जर चांगला दर मिळाला तर तो थोडेफ़ार सावरू शकेल. पण उसाचा दर ठरवल्याशिवाय जर ऊसतोड झाली तर शेतकऱ्याचे नुकसान होईल.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २३ नोव्हेबरच्या ऊसपरिषदेत उसाचा दर ठरेल. त्याच्याअगोदर ऊसतोड करू नये. उसाचा दर  ठरायच्या आत जर ऊसतोड झाल्या तर संबंधित साखर कारखान्याची कार्यालये पेटवून दिली जातील."असे खराडे यांनी म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळी खराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दिशेने पलूसला कडकनाथ कोंबडया भिरकावल्या होत्या.

कडकनाथ घोटाळ्याकडे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खराडे यांनी 'उसाचा दर न ठरवता ऊसतोड सुरु केली तर कारखान्याची कार्यालये पेटवुन देण्याचा इशारा दिलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com