एकही जागा मिळत नसल्याचे दुःख; पण रिपब्लिकन पक्ष शिवसेना-भाजपा सोबतच राहणार
नरेंद्र मोदी हे देशातील पहिले ओबीसी पंतप्रधान असून ते जातीयवादी नाहीत, असे स्पष्ट करताना "रिपब्लिकन पक्षाला अद्यापपर्यंत एकही जागा न सोडण्याचे दुःख असले तरी,आशा सोडलेली नाही. मात्र आम्ही शिवसेना-भाजपा सोबतच राहणार आहोत.प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचीत आघाडीच्या सभेला अमाप गर्दी होत असली तरी त्यांच्या मतांच्या विभागणीचा फायदा हा युतीलाच होणार असून युती ही 42-43 जागांवर जिंकून येणार आहे," असे प्रतिपादन आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी उल्हासनगरात केले.
उल्हासनगर : नरेंद्र मोदी हे देशातील पहिले ओबीसी पंतप्रधान असून ते जातीयवादी नाहीत, असे स्पष्ट करताना "रिपब्लिकन पक्षाला अद्यापपर्यंत एकही जागा न सोडण्याचे दुःख असले तरी,आशा सोडलेली नाही. मात्र आम्ही शिवसेना-भाजपा सोबतच राहणार आहोत.प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचीत आघाडीच्या सभेला अमाप गर्दी होत असली तरी त्यांच्या मतांच्या विभागणीचा फायदा हा युतीलाच होणार असून युती ही 42-43 जागांवर जिंकून येणार आहे," असे प्रतिपादन आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी उल्हासनगरात केले.
आठवले गटाचे केंद्रीय उपाध्यक्ष सुरेश सावंत यांच्या मातोश्री मंजुळाबाई यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.रामदास आठवले हे सुरेश सावंत यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते.त्यांनी जेष्ठ नेते सीता सावंत यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.त्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव,प्रदेश नेते अण्णा रोकडे,बी.बी.मोरे,नाना पवार आदी यावेळी उपस्थित होते.
ज्या पक्षाला आम्ही साथ दिली तो पक्ष सत्तेत आलाच हा इतिहास आहे.काँग्रेसने माझे दिल्लीतील बंगल्यातील सामान बाहेर फेकले होते.हे कसं विसरणार?असा प्रश्न उपस्थित करताना "आघाडी सोबत जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती हाक दिल्यावर आंबेडकरी चळवळीतील पत्रकार-साहित्यिक-डॉक्टर-शिक्षक-अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यावरच शिवसेना-भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतला." असे आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक जिंकू शकत नाही.1996 मध्ये हा प्रयोग फसला होता.यावरही आठवले यांनी लक्ष वेधले.
"राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेले वक्तव्य बालिश असल्याचा आरोप आठवले यांनी केला. पाकिस्तान ने दाऊदला आणि अजहर मसूदला भारताच्या ताब्यात दिले पाहिजे,आतंकवाद्याचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तान ने भारताची साथ दिली पाहिजे,पाकिस्तान ने नरेंद्र मोदींच्या सब का साथ सबका विकास वाक्या प्रमाणे इम्रान खान यांनी सुद्धा बोलले पाहिजे. भारत आणि पाकिस्तान चा विकास सर्वांचा विकास या प्रकार ची पाकिस्तान ने भूमिका घेतली पाहिजे,असे मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.

