नाथाभाऊ पक्षात आले तर आनंदच : बाळासाहेब थोरात

भाजपमधून बाहेर पडण्याचे संकेत व इशारे देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल दिल्लीवारी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, त्यांना भाजपाध्यक्ष तर सोडाच; पण कार्यकारी अध्यक्षांचीही वेळ मिळालेली नव्हती.
We Will Be Happy if Ekanath Khadase Joins Congress Say Balasaheb Thorat
We Will Be Happy if Ekanath Khadase Joins Congress Say Balasaheb Thorat

मुंबई : नाथाभाऊ खडसे हे आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे. त्यांची अहवेलना झाली हे आम्हांला देखील आवडलेले नाही. अशी माणसे पक्षात आली तर आम्हाला आनंदच होईल. पक्षाला त्यामुळे बळकटी मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केले. 

भाजपमधून बाहेर पडण्याचे संकेत व इशारे देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल दिल्लीवारी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, त्यांना भाजपाध्यक्ष तर सोडाच; पण कार्यकारी अध्यक्षांचीही वेळ मिळालेली नव्हती. "आपल्याला पक्षातून दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. मी 'यांची' आरती करावी काय?'' असे विचारणारे खडसे यांना भाजपच्या दृष्टीने बोलायचे तर रिकाम्या हातानेच माघारी परतले. आज खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

खडसेंच्या नाराजी बाबत थोरात यांना विचारले असता, ते पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्याकडून आम्हांला प्रस्ताव आलेला नाही आणि आम्ही देखील काही प्रस्ताव दिलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. पंकजा मुंडे चांगलं काम करत होत्या, त्यांची नाराजी मला माहित नाही. मात्र, इतकी नाराजी योग्य नाही, असेही थोरात यावेळी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com