तुम्ही खूप त्रास सहन केला, आता नवा काश्‍मीर निर्माण करू : मोदी 

तुम्ही खूप त्रास सहन केला, आता नवा काश्‍मीर निर्माण करू : मोदी 

ह्युस्टन : "काश्‍मीरमध्ये सध्या नवे वारे वाहत आहेत. आपण मिळून नवा काश्‍मीर निर्माण करू. हा काश्‍मीर सर्वांसाठी खुला असेल,' अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली.
 
मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आले असताना काश्‍मिरी पंडितांच्या 17 जणांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. 

भारत सरकारने पाच ऑगस्टला कलम 370 रद्द करत जम्मू-काश्‍मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतला आणि त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. या निर्णयाचे काश्‍मीर पंडितांनी स्वागत केले होते. या पार्श्‍वभूमीवर येथील काश्‍मिरी पंडितांनी मोदींची आज भेट घेतली. तीस वर्षे संयम बाळगल्याबद्दल मोदींनी काश्‍मिरी पंडितांचे आभार मानले. 

"तुम्ही खूप त्रास सहन केला आहे. आता काश्‍मीरमध्ये सध्या बदलाचे नवे वारे वाहत आहेत. आपण सर्व जण मिळून नवा काश्‍मीर निर्माण करू या. या नव्या काश्‍मीरमध्ये सर्वांचे स्वागत असेल,' असे मोदी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. 

भारताचा विकास घडवून आणण्यासाठी मोदी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना काश्‍मिरी पंडितांनी पाठिंबा व्यक्त केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.

कलम 370 रद्द केल्याबद्दल सात लाख काश्‍मीर पंडित सरकारचे ऋणी आहेत, असे पंडितांनी मोदींना सांगितले. विस्थापित झालेल्या काश्‍मिरी पंडितांना एकत्र आणण्यासाठी गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कृती समितीची स्थापना करावी, अशी मागणीही या वेळी मोदींकडे करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com