आम्हाला विरोधी बाकावर भुजबळ, अजितदादासारखे नेते हवे आहेत : गिरीश महाजन 

आम्हाला विरोधी बाकावर भुजबळ, अजितदादासारखे नेते हवे आहेत : गिरीश महाजन 

मुंबई : "आम्हाला विरोधीपक्षातही काही नेते हवे आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासारखे नेते आहेत. त्यामुळे सर्वानाच आम्हाला भाजपत घेता येणार नाही असा टोला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. 

दोन्ही कॉंग्रेसचे आमदार मोठ्याप्रमाणात भाजपत प्रवेश करीत आहेत या पार्श्‍वभूमीवर महाजन म्हणाले, की दोन्ही कॉंग्रेसला गळती लागली आहे. भाजपत प्रवेश करण्यासाठी मोठी रांग लागली आहे. काही मंडळी विरोधीपक्षात आम्हाला हवे आहेत. विरोधकही आम्हाला हवे आहेत. विरोधीबाकाकडे बोट दाखवायला आम्हाला नेते हवे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्या चौकशी कोणाच्या सुरू आहेत हे सांगण्याची गरज नाही. काही मंडळींनी सत्तेत असताना मोठे काम केले आहे त्यामुळे ते विरोधी बाकावर हवेत. कॉंग्रेस म्हणजे वादळात भरकटलेले जहाज असल्याचेही ते म्हणाले. 

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व पुढे येत आहे त्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये आगामी निवडणुकीसाठी ठरले आहे ते काय ठरले हे मी सांगणार नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com