पिंपरी-चिंचवडमध्ये सीएए निषेधाला सीएए स्वागताने उत्तर

सीएए (नागरिक दुरुस्ती कायदा) विरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाला उत्तर म्हणून या कायद्याला पाठिंबा देण्याची चळवळ पिंपरी-चिंचवडमधून सुरु होत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सीएए निषेधाला सीएए स्वागताने उत्तर

पिंपरीः सीएए (नागरिक दुरुस्ती कायदा) विरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाला उत्तर म्हणून या कायद्याला पाठिंबा देण्याची चळवळ पिंपरी-चिंचवडमधून सुरु होत आहे. 

देशभर या कायद्याचा निषेध होत असताना आज त्याच्या जाहीर स्वागताचा कार्यक्रम शहराच्या मध्यवर्ती चौकात (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) सायंकाळी होऊ घातला आहे. त्यासाठी सोशल मिडियात वुई सपोर्ट सीएए या हॅशटॅग खाली मुव्हमेंट उभी करण्यात आली आहे.

सीएएच्या समर्थनार्थ `चला देशासाठी उभे राहू` असे नाव या चळवळीला देण्यात आले आहे. त्याचे मेसेज भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे खासगी पीए यांच्याकडून टाकण्यात आले आहेत. मात्र, या सीएए समर्थन चळवळीचे आयोजक भाजप नसून सर्वसामान्य भारतीय आहेत, असे ते टाकणाऱ्या एका भाजप नगरसेवक व एका पक्षाच्या पालिका पदाधिकाऱ्याच्या खासगी पीएने सरकारनामाशी बोलताना स्पष्ट केले. 

परवा (ता.२०) शहरातील संविधानप्रेमी संघटना व नागरिकांनी सीएए विरोधात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रचंड मोठे आंदोलन शांततेत केले होते. त्याला उत्तर म्हणून तेथेच सीएएच्या समर्थनार्थ आज `चला देशासाठी उभे राहू` हे `आंदोलन` होत आहे. त्यासाठी एक भारतीय म्हणून माझा सीएएला पूर्ण पाठिंबा आहे, असे आवाहन सध्या या चळवळीच्या मेसेजमधून केले जात आहे. तसेच त्यात कुटुंब, मित्र परिवारासह सहभागी होण्याचे आवाहन पीसीएमसी सपोर्टस सीएए, इंडिया सपोर्टस इंडिया आणि वुई आर विथ कॉन्स्टीट्यूशन या हॅशटॅगखाली करण्यात आले आहे. 

रविवारच्या आंदोलनानंतर या चळवळीची पुढील दिशा ठरवली जाईल,असे भाजपच्या एका नगरसेवकाने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com