युतीधर्म पाळून चंद्रकांत खैरेंनाच मदत केली :रावसाहेब  दानवे

चंद्रकांत खैरे यांचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला. त्यांच्या विजयासाठी पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र झटले आहेत.
khaire-danve-Jadhav_
khaire-danve-Jadhav_

जालना :लोकसभा निवडणुकीत युती धर्म पाळला . औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीचे   उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला. त्यांच्या  विजयासाठी पक्षाचे  कार्यकर्ते अहोरात्र झटले आहेत.जावई  हर्षवर्धन जाधव यांना निवडणुकीत मदत करण्याचा प्रश्न उद्भवत नाही ," असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले . 

 भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीच्या राज्यातील सरकारची पाच वर्षातील कामगिरी उत्तम राहिली आहे,त्यामुळे राज्यात भाजप-शिवसेना युतीला किमान 40 ते 42 जागा मिळतील,असा दावा रावसाहेब दानवे यांनी  केला. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाची युती कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीच्या ऐन  धामधुमीत अचानक आजारी पडलेले  श्री.दानवे यांनी पहिल्यांदाच आज पत्रकारपरिषद घेऊन निवडणुकीचे अंदाज स्पष्ट केले. ते म्हणाले ,"केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत.त्यामुळे निवडणुकीत महायुतीला तीनशेच्या आसपास  जागा मिळतील.त्यामुळे नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान  होतील ."

लोकसभा निवडणुकीत  जालना लोकसभा मतदार संघातून दोन लाखापेक्षा अधिक आघाडी घेऊन विजयी होणार असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले की,"मतदार संघात अनेक योजना आणल्या,रस्ते पाणी, वीज यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून  आणल्यामुळे विकास कामे सुरू झाली आहेत.त्यामुळे दोन लाख 60 हजारांची आघाडी मिळेल  असे मला वाटते . "

" जालना शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जालना पालिकेला दीडशे कोटी रूपयांचा निधी दिला आहे.त्याचा योग्य वापर करून पाणी पुरवठा सुरळीत करावा.निधी कमी पडू देणार नाही,"  असेही ते  म्हणाले . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com