शिवसंग्रामचे संदीप पाटील म्हणताहेत, `आपलं ठरलं' 

महायुतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण केल्याने अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्रामकडून बंडोखोरीचे संकेत मिळत आहे. शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टसह सोशल मीडियावरून ‘जय गजानन महाराज आमचं ठरलं’, असा संदेश देवून उघड-उघड बंडोखोरीची भाषा सुरू केली आहे.
संदीप पाटील
संदीप पाटील

अकोला -  महायुतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण केल्याने अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्रामकडून बंडोखोरीचे संकेत मिळत आहे. शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टसह सोशल मीडियावरून ‘जय गजानन महाराज आमचं ठरलं’, असा संदेश देवून उघड-उघड बंडोखोरीची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांसमोर बंडोखोरीची डोकेदुखी राहणार आहे.

भाजप-शिवसेना महायुतीमध्ये शिवसंग्राम हा प्रमुख घटक पक्ष आहे. मराठा आरक्षणासह शिवस्मारकाच्या स्थापनेतून  शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनाकराव मेटे यांनी महायुतीत मानाचे स्थान मिळविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बाजूला ठेवण्यात आले. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये त्यांना सन्मानजनक जागा मिळण्याची आशा होती. 

भाजप-शिवसेनेकडून मित्र पक्षांसाठी १८ जागा सोडण्याचे संकेतही मिळाले होते. त्यामुळे शिवसंग्रामने अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड आणि बाळापूर या दोन मतदारसंघावर दावा केला होता. शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी बाळापूर मतदारसंघ शिवसंग्रामला सुटणार असल्याचा दावा करीत प्रचाराला व मतदारांच्या गाठीभेटीला सुरुवात केली होती. मात्र पितृपक्ष संपताच घटस्थापनेच्या दिवशी शिवसेनेने बाळापूर मतदारसंघातून नितीन देशमुख यांनी उमेदवारी जाहीर करीत एबी फॉर्मचे  वितरण केले. त्यामुळे शिवसंग्रामला बाळापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही, हे निश्‍चित झाले. शिवसेनेचे एबी फॉर्म वितरित होताच संदीप पाटील यांनी सोशल मीडियातून बंडोखोरीचे संकेत देणारे संदेश व्हायलर करण्यास सुरुवात केली.

२०१४ मध्येही अपक्ष म्हणून उमेदवारी
भाजपसोबतच्या युतीत २०१४ च्या निवडणुकीतही उमेदवारी न मिळाल्याने संदीप पाटील यांनी बाळापूरमधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती व ते निवडणुकही लढले होते. १८ हजारांवर मते घेवून त्यांनी थेट भाजपच्या उमेदवारालाच आव्हान दिले. त्यामुळे बाळापूर मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

अखेरचा जोर, मुंबईत दाखल!
महायुतीकडून बाळापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला जागा मिळाल्याने नाराज झालेले मित्र पक्ष शिवसंग्रामचे नेते संदीप पाटील यांनी सोमवारीच तडकाफडकी मुंबई गाठली. येथे ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायकराव मेटे यांची भेट घेवून उमेदवारीसाठी अखेरचा जोर लावणार आहेत.

...नाही तर अपक्ष उमेदवारी नक्की!
बाळापूर विधानसभा मतदारसंघात २०१४ नंतर पुन्हा एकदा महायुतीत शिवसंग्रामला डावलण्याचा प्रयत्न झाला आहे. महायुतीकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नाही तर बाळापूरमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. पक्षाध्यक्ष विनाकराव मेटे यांच्या भेटीनंतर अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.       

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com