आमचे ठरलय,  भाजपचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही : हुसैन दलवाई 

हुसैन दलवाई यांनी आज थेट सामना कार्यालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली असल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे .
husen-dalwai-
husen-dalwai-

मुंबई : काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सामना करायला जाऊन भेट घेतली .

भेट झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हुसेन दलवाई असे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपचे सरकार होऊ नये अशी आमची इच्छा आहे . तसेच महाराष्ट्रात  राष्ट्रपती राजवट येऊ नये हे काँग्रेस- राष्ट्रवादीने  ठरवले आहे. 


पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना हुसेन दलवाई म्हणाले , भाजपच्या सरकार आम्हाला नक्कीच नको आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी त्यांनी तातडीने महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष घालावे आणि महाराष्ट्रामध्ये भाजपाला सत्ता बनवण्यापासून रोखावे असे आमचे मत आहे. 


सध्या महाराष्ट्रामध्ये आणि राष्ट्रपती राजवटीची भीती दाखवूनविरोधकांमध्ये फूट  पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे . परंतु आम्ही  तसे होऊ देणार नाही . राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घेऊ देणार नाही . 


सरकार बनवण्यासाठी अत्यंत थोडा काळ हाताशी राहिलेले असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगाने हालचाली का करत नाही असे विचारले असता हुसेन दलवाई म्हणाले,  राजकारण  आपल्या गतीने चालत असते.  धीम्या  गतीने चालत असते . त्याच  पद्धतीने राजकारण  चालेल . मात्र आम्ही ठरवले आहे की भाजपचे सरकार बनवू  देणार नाही. 


भाजपचे हिंदुत्व आणि शिवसेनेचे हिंदुत्व यामध्ये मोठा फरक आहे . भाजपपेक्षा शिवसेना कधीही चांगला पक्ष आणि पर्याय आहे . भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशानुसार चालावे लागते.  आजही देवेंद्र फडणवीस यांना सरसंघचालक भागवत यांचा सल्ला घ्यावा लागतो . भाजपचे हिंदुत्व आणि शिवसेनेचे हिंदुत्व यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. 


शरद पवार यांच्या  विषयी बोलताना श्री. दलवाई म्हणाले ,  पवार साहेबांनी चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि त्याला निश्चितच यश मिळेल असे मला वाटते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com