We have conveyed feelings of MLAs to high command : Yashomati Thakur | Sarkarnama

आमदारांच्या भावना हायकमांडपर्यंत पोहोचवल्या : यशोमती ठाकूर 

  सोनाली शिंदे  
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पुढे महाराष्ट्रात काय होणार आहे यावेळी खोदून खोदून विचारले असता यशोमती ठाकूर यांनी  हसत हसत असे सांगितले की, पुढे काय होणार आहे आम्हाला माहिती नाही. 

नवी दिल्ली :  मी एआयसीसीची  सेक्रेटरी आहे.  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची  कार्याध्यक्ष आहे . माझी दिल्ली भेट रुटीन  स्वरूपाची आहे . दिल्लीला आल्यानंतर मोठ्या नेत्यांना मी भेटतच असते .  आमदारांच्या मनात काय आहे, आमच्या मनात काय आहे ,हे पक्षश्रेष्ठींना भेटून आम्ही सांगितलेल आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी सांगितले. 

महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष शिवसेनेला पाठिंबा देणार काय यावर बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, आमचे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या चर्चेमध्ये याविषयी ठरेल . काय ठरेल हे अद्याप मला माहिती नाही . 

विजय वडेट्टीवार म्हणतात भाजपा आमदार फोडण्याचा प्रयत्न करीत आहे.  तुम्हाला काय वाटते यावर प्रतिक्रिया देताना ठाकूर म्हणाल्या,  गोव्यात काय झाले  ? गोव्यात पैशाचा वापर कोणी केला ? फोडाफोडी  कोणी केली ? गोव्यामध्ये कोणाकडे मताधिक्य जास्त होते आणि सरकार कोणाचे स्थापन झाले हे तुम्ही पाहिलेला आहे. 

कर्नाटकामध्ये सुद्धा काँग्रेसची माणसे कोणी फोडली? जे आमदार फुटले  त्यांचे करीयर उध्वस्त झाले  आहे . त्यांना चोरासारखे पुन्हा  इलेक्शनला सामोरे जावे लागणार आहे.  कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागलेला नाही . त्यामुळे ते अधांतरीच आहेत .  सत्ताधारी राजकारणासाठी काहीपण या भूमिकेतून पुढे जातात, त्याची नोंद आपण घेतली पाहिजे. 

महाराष्ट्रामध्ये भाजपतर्फे आमदारांची फोडाफोड सुरु आहे काय असे विचारले असता त्या म्हणाल्या ,  फोडाफोडीचे माझ्या कानावर अजून काही आलेले नाही . पण ही शक्यता नाकारता येणार नाही . मी मुंबईला हॉस्पिटलमध्ये जाऊन कर्नाटकाची पाटील यांना भेटले होते . सहा कारखान्यांचे प्रमुख असताना ते घाबरत होते . भाजपवाले कोणत्या थराला जाऊन ब्लॅकमेल करतात याचा अंदाज तुम्हाला यावरून यायला हवा. 

तुम्ही अलीकडच्या काळात शरद पवार यांना वारंवार भेटत आहात ते राज्यात मिळून सत्ता स्थापनेसाठी का?   यावर यशोमती ठाकूर  म्हणाल्या,  आम्ही नेहमीच शरद पवारांकडे जात असतो.  यावेळी योगायोग आहे की मी कार्याध्यक्ष आहे आणि त्यांना भेटायला गेले आहे . या सिच्युएशनमध्ये मी त्यांना भेटायला गेले तर काय हरकत आहे ?   एवढ्या उमद्या  आणि अनुभवी माणसाला आपण भेटलेच पाहिजे.  चार गोष्टी आपण विचारल्या  पाहिजेत.  त्यांचे मार्गदर्शन घेतलेच पाहिजे . 

पुढे महाराष्ट्रात काय होणार आहे यावेळी खोदून खोदून विचारले असता त्यांनी हसत हसत असे सांगितले की, पुढे काय होणार आहे आम्हाला माहिती नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख