Bhumre-Bagde
Bhumre-Bagde

जमीनीवर शाळा काढल्या, गाळे नाही : संदीपान भुमरे

..

औरंगाबादः पैठण तालुक्‍यात माझ्या एकट्याचीच जमीन आहे का? हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक पुढाऱ्यांच्या या भागात जमीनी आहेत हे विधान मी दावरवाडीच्या सभेत केले होते. पण गावातील रिकामटेकड्या लोकांनी सोशल मिडियावर माझे विधान काटछाट करून दाखवले आणि माझ्या वाक्‍याचा विपर्यास केला. पुढाऱ्यांनी संस्था, शाळासांठी जमीनी घेतल्या त्यात वावगे काय? असे मी म्हणालो होतो. 


हरिभाऊ बागडे हे माझे गुरूवर्य आहेत, त्यांच्यावर मी आरोप करणे कदापी शक्‍य नाही, पण केवळ राजकीय हेतूने, बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आमदार संदीपान भुमरे यांनी सांगितले.

मतदारसंघातील दावरवाडी येथील एका सभेत आमदार भुमरे यांनी विरोधाकांकडून जमीनी लाटल्याचा आरोप फेटाळतांना काही उदाहरणे दिली होती. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या तालुक्‍यात जमीनी आहेत असे विधान असलेला त्यांच्या व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतांना भुमरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भुमरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळे सध्या मी मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. पण काही रिकामटेकडी लोकं असतांत ज्यांना सोशल मिडियावर राजकीय नेत्यांची भाषण सोयीनूसार बदल करून फिरवण्याची सवय असते. अशाच लोकांनी माझ्या देखील भाषणाची क्‍लीप मोडून तोडून वापरली.

राजकीय पुढाऱ्यांनी तालुक्‍यात जमीनी घेतल्या हे मी बोललो, पण त्या शाळा आणि संस्थांसाठी घेतल्या आणि त्यात काही गैर नाही हे देखील सांगितले. हरिभाऊ बागडे यांनी चितेगांवमध्ये पाच एकर जमीन घेतली ती देखील संस्थेसाठी घेतली आहे, त्यात चुकीचे काहीच नाही. पण माझे अर्धवट वाक्‍य सोशल मिडियावर पसरवण्यात आले. बागडे यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांच्या चारित्र्यांवर एक शिंतोडा नाही, मग मी त्यांच्यावर आरोप कसा करने असेही भूमरे म्हणाले.

माझ्यावर दोन एकर जमीन लाटल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय, पण आरोप करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो ज्या जागा आम्ही घेतल्या त्यावर शाळा, संस्था उभ्या केल्या, गाळे नाही काढले. बागडे नानांनी देखील जी जमीन घेतली ती शाळेसाठी घेतली. तेव्हा आरोप करणाऱ्यांनी याची शहानिशा करून मग बोलावे असे आवाहन देखील भुमरे यांनी केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com