अंधारात नव्हे, लाखोंच्या साक्षीने शपथ घेतलीये, सरकार टिकणारच : छगन भुजबळ

आम्ही रात्रीच्या अंधारात नव्हे तर भरदिवसा शिवाजीपार्कवर लाखोंच्या साक्षीने शपथ घेतली आहे. त्यामुळे हे सरकार टिकणारच असा टोमणा राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून मारला
Chagan Bhujbal Taunts Devdendra Fadanavis
Chagan Bhujbal Taunts Devdendra Fadanavis

नाशिक : राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांना आज चांगलेच फटकारले. ते म्हणाले, "रात्रीच्या अंधारात, मध्यरात्री, पहाटे काय चालते?. काय होते?. त्याला काय म्हणतात?. सगळ्यांना माहिती आहे. आम्ही मात्र दिवसा, लाखोंच्या साक्षीने शिवाजी पार्कवर शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील नवे सरकार सत्तेत आले. हे सरकार टिकणारच. इतरांनी फार चिंता करु नये.'

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महिन्याभराच्या खंडानंतर ते नाशिकला आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. या सगळ्यांच्या शुभेच्छा स्विकारीत त्यांनी सगळ्यांची विचारपुस केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सध्याचे सरकार धोक्‍याने आले आहे. ते टिकणार नाही.' असा दावा केला होता. त्यावर भुजबळ म्हणाले, "धोक्‍याने कसे? धोका कशाला म्हणतात?. रात्रीच्या अंधारात, मध्यरात्री, पहाटे शपथ घेणारे, काम करणारे यांना काय म्हणतात हे सुज्ञांना माहित आहे. आम्ही तर दिवसा आणि तेही शिवाजी पार्कवर लाखोंच्या साक्षीने शपथ घेतली आहे. त्यानंतर सध्याचे सरकार अस्तित्वात आले. त्याला धोका कसे म्हणता.

ते म्हणाले, सध्याच्या सरकारमध्ये सगळे अनुभवी लोक आहेत. मी स्वतः 1985 पासून निवडून येतो आहे. जवळपास पंचवीस वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. बाळासाहेब थोरात 1985 पासून विधानसभेवर निवडून येत आहेत. सरकार कसे चालवतात. जनतेचे प्रश्‍न कसे मार्गी लावतात हे आम्हीला माहित आहे. प्रामाणिकपणे राज्याच्या प्रश्‍नांवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. सरकार निश्‍चितपणे टिकेल. यशस्वी ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com