we fight together to defeat corona says ashok chavan | Sarkarnama

कोरोनाची लढाई सर्वांना मिळून जिंकायची आहे - अशोक चव्हाण

अभय कुळकजाईकर
बुधवार, 25 मार्च 2020

गुढीपाडवा हा महत्वाचा दिवस असून नवीन वर्षाच्या स्वागताबरोबरच आता आपल्या सर्वांना कोरोना विरुद्धची लढाई सर्वांना मिळून जिंकायची आहे. त्या दृष्टीने आपआपल्या घरी राहून ही लढाई जिंकण्याचा निर्धार करुया, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. २५) केले.

नांदेड ः गुढीपाडवा हा महत्वाचा दिवस असून नवीन वर्षाच्या स्वागताबरोबरच आता आपल्या सर्वांना कोरोना विरुद्धची लढाई सर्वांना मिळून जिंकायची आहे. त्या दृष्टीने आपआपल्या घरी राहून ही लढाई जिंकण्याचा निर्धार करुया, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. २५) केले.

गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत पालकमंत्री चव्हाण व त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी नांदेडला शिवाजीनगर येथील ‘आनंद निलयम’ निवासस्थानी बुधवारी (ता. २५) गुढी उभारली. त्यानंतर ते बोलत होते. गुढीपाडव्याच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देण्याची गरज असल्याचे सांगून कोरोनाच्या लढाईसाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी देखील एकमेकांना सहकार्य करण्याची नितांत गरज आहे.

कोरोनाचे संकट हे फक्त महाराष्ट्र आणि भारतापुरतेच मर्यादित नव्हे तर समस्त मानवजातीसाठी भयानक परिस्थिती आहे. म्हणूनच एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. आज घराघरात पारंपारिक गुढीसोबतच कोरोनाविरुद्ध लढण्याच्या ठाम संकल्पाची गुढी उभारली. ही लढाई केवळ सरकारची लढाई नाही, तर ही प्रत्येक व्यक्तीची लढाई आहे. या लढाईत सरकारला नागरिकांकडून फक्त शासकीय निर्देशांच्या काटेकोर अंमलबजावणीची अपेक्षा असल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी मिळून निर्धार करुया आणि कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनाच मिळून जिंकायची आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा आणि शासनाचे निर्देशाचे काटेकोरपणे पालन केले तर लढाई निच्शितपणे जिंकू, असा विश्‍वासही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख