शरद पवारांचा खूप अभिमान वाटतो 

.
Sharad_Pawar
Sharad_Pawar

नगर  :  राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भगिनी व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काैन्सिलच्या सदस्या मिनाताई जगधने यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिमान वाटतो , असे `सरकारनामा` शी बोलताना सांगितले.


पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, ``आम्हा भावंडांना त्यांचा खूप अभिमान वाटतो. कितीही मोठा प्रश्न असला, तरी ते हुशारीने सोडवितात, हे महाराष्ट्रानेच नव्हे, देशाने पाहिले. आमच्या कुटुंबातील कोणताही प्रश्न असला, तरी त्यांचा निर्णय अंतीम असतो. कुटुंबावर कोणतेही संकट ओढावले, तरी तेच धावून येतात. त्यांचा शब्द हा प्रमान असतो.`` 


कायम प्रवास, सभा, बैठका करताना त्यांना वयाचे भान राहत नाही. याबाबत बंधू शरद पवार यांची काळजी करताना जगधने म्हणतात, ``ऊन, पाऊस, थंडी याची तमा न करता या वयातही ते समाजकारण, राजकारणात कायम सक्रीय असतात. त्यामुळे आम्हा भावंडांना त्यांची खूप काळजी वाटते. कितीही धावपळ असली, तरी काैटुंबिक कार्यक्रम किंवा काही अडचणी उदभवल्या की ते वेळेत वेळ काढून येतात. आमची काळजी घेतात. वहिनीही आमची खूप काळजी घेतात. फक्त त्यांनी आता स्वतःची काळजी घ्यावी. दाैरे, दगदग कमी करावी असे वाटते.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com