विकासासाठी कायदा सोडून काम करावे लागते, म्हणून तुकाराम मुंडे सारखे अधिकारी नको : महापौर अग्रवाल

तुकाराम मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना कोणत्याही महापालिकेवर नियुक्ती देण्यात येऊ नये , असा ठराव मी मांडला .-विजय अग्रवाल
विकासासाठी कायदा सोडून काम करावे लागते, म्हणून तुकाराम मुंडे सारखे अधिकारी नको  : महापौर अग्रवाल

अकोला :   " तुकाराम मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना कोणत्याही महापालिकेवर नियुक्ती देण्यात येऊ नये , असा ठराव मी मांडला," असे  अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी सांगितले . 

नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनीही कंबर कसली असून एका महापौराच्या मदतीला दुसरा महापौर धावून आलाय.महापौर अग्रवाल म्हणतात मुंडे सारख्या अधिकाऱ्याला महापालिकेत नियुक्तच करण्यात येऊ नये.

महापौर विजय अग्रवाल म्हणले , " महाराष्ट्रात गृह खात्याचे आणि महसूल खात्याचे स्वतंत्र कॅडर  आहे तसेच नगरविकास खात्याचे स्वतंत्र कॅडर  तयार झाले पाहिजे . महसूल आणि नागरविकासच्या कामात बदल आहे . महापौरांच्या परिषदेत नाशिकच्या महापौरांनी जी व्यथा मांडली आणि आधीही त्याच्या ज्या तक्रारी येत होत्या . त्यामुळे  तुकाराम मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना कोणत्याही महापालिकेवर नियुक्ती देण्यात येऊ नये , असा ठराव मी मांडला . "

श्री . अग्रवाल पुढे म्हणाले ," महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यासह अनेक शहरांना  खूप निधी दिला . पण हे काम करीत असताना पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात समन्वय असायला हवा . तरच विकास होऊ शकतो . आणि अशावेळेस कायदा सोडून आपण ज्याकाही गोष्टी करू शकतो , त्याकारण्याची गरज असते . अधिकाऱयांनी जर हे समजून घेतले नाही आणि अपमान करण्याचा जर स्वभाव असला तर अशा अधिकाऱ्याला जेथे लोकप्रतिनिधी काम करतात अशा कोणत्याही संस्थेत नियुक्ती देऊ नये असा आम्ही ठराव मांडला . "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com