सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत तुमच्या आघाडीची मते आमच्या उमेदवारांना कां मिळाली नाहीत, असे थेट आम्ही खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारु शकत नाही, असे आमदार शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीपुर्वी खासदार उदयनराजे व आमदार शंभूराज यांची युती झाली होती.
नियोजन समितीच्या निवडणुकीत तुमचे गणित कुठे चुकले, असे पत्रकारांनी विचारल्यावर आमदार देसाई म्हणाले, आमचे खासदार उदयनराजेंसोबत एकमेकांना मदत करण्याचे ठरले होते. पण त्यांच्याकडून मदत झाली नाही. नेमके कुठे गडबड झाली हेच समजले नाही. मुळात छत्रपती घराण्याविषयी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांना थेट विचारू शकत नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.