आम्ही थेट राजीनामे  देतो, ते खिशात घेऊन फिरत नाही !

शिवसेनेच्यावतीनेनेहमीच आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो, असे सांगण्यात येत होते. मात्र, आम्ही थेट राजीनामा देतो, ते खिशात घेऊन फिरत नाही, असा टोला माजी महापौर भगवान घडमोडे यांनी लगावला.
shivsena-BJP
shivsena-BJP

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहरासाठी 1,680 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. त्याचे टेंडर निघाले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच डिसेंबर रोजी अध्यादेश काढून योजनेला स्थगिती दिली.

यामुळे भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी शुक्रवारी (ता.13) राजीनामा दिला. महापालिकेतील या पाणी पुरवठा योजनेचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यावरूनच शिवसेनेसोबतची युती भाजपने तोडली असून आता भाजप महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याची माहिती शनिवारी (ता.14) आमदार अतुल सावे व शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शुक्रवारच्या राजीनाम्या नाट्यानंतर शनिवारी किशनचंद तनवाणी, अतुल सावे यांनी जिल्हा कार्यालयात सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महापौर नंदकुमार घोडेले यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. भाजपचे सर्व नगरसेवक व महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष तनवाणी यांच्याकडे आपले राजीनामे सुर्पूत केले असल्याचे श्री. सावे यांनी सांगितले.

शिवसेनेच्यावतीनेनेहमीच आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो, असे सांगण्यात येत होते. मात्र, आम्ही थेट राजीनामा देतो, ते खिशात घेऊन फिरत नाही, असा टोला माजी महापौर भगवान घडमोडे यांनी लगावला. यावेळी उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, राजू शिंदे, कचरु घोडके व 23 नगरसेवक 6 अपक्ष नगरसेवक उपस्थित होते.    

राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीत पुढील भूमिकेविषयी चर्चा करण्यात आली. हे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येतील व येत्या दोन दिवसात याविषयी बैठकी होणार आहे. उपमहापौरांनी महापौरांकडे राजीनामा द्यावा, अशा आशयाच्या काही बातम्या आल्या होत्या. त्यावर सोमवारी (ता.16) उपमहापौरांचा राजीनामा महापौरांकडे दिला जाणार आहे. तत्पूर्वी महापौर हे युतीच्या मतावर निवडून आले त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असेही श्री. तनवाणी यांनी सांगितले.


शिवसेनेतर्फे नेहमी शहराचा उल्लेख संभाजीनगर केला जातो. माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आवर्जून संभाजीनगरचा उल्लेख करतात. यामुळे शिवसेनेने महापालिकेत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मांडावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. यासह जिल्हा परिषदेतही ठराव मांडावा, अशी मागणीही यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com