फडणवीसांचे दिल्लीत जाणे आमच्या हातात - प्रकाश शेंडगे

"भाजपचे सरकार आल्याशिवाय मी दिल्लीला जाणार नाही असे जरी देवेंद्र फडणवीस म्हणत असले तरी आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात त्यांचे सरकार येणार नाही. त्यामुळे फडणवीस यांच दिल्लीत जाण आमच्या हातात आहे," असे वक्तव्य माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर केले.
 we decide when devendra fadanvis will go to delhi says prakash shendge
we decide when devendra fadanvis will go to delhi says prakash shendge

पुणे - "भाजपचे सरकार आल्याशिवाय मी दिल्लीला जाणार नाही असे जरी देवेंद्र फडणवीस म्हणत असले तरी आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात त्यांचे सरकार येणार नाही. त्यामुळे फडणवीस यांच दिल्लीत जाण आमच्या हातात आहे," असे वक्तव्य माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर केले.

पुण्यात धनगर समाज उन्नती संस्थेने आयोजित केलेल्या मेळाव्यात शेंडगे बोलत होते. यावेळी शेंडगे यांनी आक्रमकपणे आपल्या भावना मांडल्या.

शेंडगे म्हणाले, 'फडणवीस यांना राज्यात सत्ता आणून दिल्लीत जायचं आहे. पण राज्यातील सत्ता आमच्याशिवाय येऊ शकत नाही. गेल्या वेळी भाजपला सत्ता मिळाली ती आमच्यामुळे. पण आरक्षणाचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही. फडणवीस दिल्लीत जाणार अशी चर्चा सुरू झाल्यावर त्यांनी इथली सत्ता आणण्याचे भाष्य केले. मात्र इथली सत्ता आणण्यासाठी आम्हाला आरक्षण द्यावे लागेल, त्यामुळे त्यांचं दिल्लीत जाणं आमच्यावर अवलंबून आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्या सरकारने आम्हाला आरक्षण द्यावे."

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सावधपणे भाषण केले. त्यांनी आक्रमक झालेल्या प्रकाश शेंडगे यांच्याबद्दल बोलताना, "शेंडगे आमचे मित्र आहेत. त्यांनी आणि मी वीस वर्षे एकत्रितपणे काम केले आहे. ते आज शिवसेनेत असले तरी आमचेच आहेत. ते शरीराने शिवसेनेत असले तरी मनाने आमच्याकडेच आहेत," अशी मिश्किल टिपणी केली.

"ते सध्या ज्यांच्यासोबत आहेत त्यांना एवढंच सांगावं,' आमच्या सरकारने धनगर समाजासाठी जी तरतूद केली आहे. आम्ही धनगर समाजाच्या उन्नतीसाठी एक हजार कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. त्याच्या अंमलबजावणी करा. त्या अंमलबजावणीसाठी शेंडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com