"We are healed, thank you to all the doctors and staff of Naidu!" | Sarkarnama

"आम्ही बरे झालो, "नायडू'तील सर्व डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांचे आभार !"", कोरोनामुक्त दाम्पत्यांच्या भावना 

उमेश घोंगडे 
बुधवार, 25 मार्च 2020

आम्ही बरे होऊन ज्या प्रकारे घरी जात आहोत. त्याचप्रमाणे इतर सर्व रूग्णदेखील सुखरूप घरी येतील, असा विश्‍वास या दाम्त्याने या डायरीतील मनोगतामध्ये व्यक्त केला आहे. 

पुणे : नायडू हॉस्पिटल आणि येथील सर्व डॉक्‍टर, नर्सेस कर्मचारी व पुणे महापालिकेचे सर्व पदाधिकारी यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. गेल्या पंधरा दिवसात इतक्‍या चांगल्या प्रकारे मिळालेल्या उपचारांमुळे आज आम्ही कोरोनापासून मुक्त झालो. आमच्याप्रमाणे इतर रूग्णदेखील कोरोनामुक्त होतील, असा शब्दात पुण्यातील नायडू हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलेल्या दाम्पत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

गेल्या नऊ मार्च रोजी या दाम्पत्याला या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह असलेले हे राज्यातील पहिले रूग्ण होते. आज ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. 

या रूग्णांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज सकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. रूग्णालय सोडताना रूग्णालयाच्या डायरीत आलेला अनुभव भावनाविवश होत मांडल्या. नायडूतील सर्व डॉक्‍टरर्स, नर्स, कर्मचाऱ्यांचेही ऋणही व्यक्त केले आहेत. 

आम्हला त्रास वाटू लागल्याने नऊ मार्चला आम्ही या रूग्णालयात दाखल झालो. गेल्या पंधरा दिवसात आमच्यावर चांगले उपचार झाले. इथले डॉक्‍टर आणि प्रत्येक कर्मचाऱ्याने आमची काळजी घेतली त्याबद्दल त्यांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो.

आम्ही बरे होऊन ज्या प्रकारे घरी जात आहोत. त्याचप्रमाणे इतर सर्व रूग्णदेखील सुखरूप घरी येतील, असा विश्‍वास या दाम्त्याने या डायरीतील मनोगतामध्ये व्यक्त केला आहे. 

आमच्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्‍टर, नर्सेस तसेच इतर कर्मचाऱ्यांचे मनापासून अभार मानताना त्यांनी महापालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेदेखील आभारमानले. महापालिकेची आरोग्य व्यवस्था तसेच नायडू रूग्णालयाचा संपूर्ण कर्मचारीवर्ग यांनी आम्हाला खूप चांगली वागणूक दिल्याचा उल्लेख या दाम्पत्याने केला आहे. 
----- 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख