We also help flood victims but we don't advertise : Amitabh Bachhan | Sarkarnama

आम्ही मदत करतो,पण जाहिरात करत नाहीत : अमिताभ बच्चन

सरकारनामा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मुंबई :   "बॉलिवूड कलाकार मदत करतात, पण त्याची जाहिरात करत नाही. त्याचपैकी मी एक आहे," असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते  अमिताभ बच्चन यांनी केले आहे . 

 'कोन बनेगा करोडपती'च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . आपण  पुरग्रस्तांना मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले .  

कोल्हापूर, सांगली येथील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत. मात्र या पुरग्रस्तांकडे बॉलिवूडकरांनी पाठ फिरवली असल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील याबाबत आवाज उठवला होता .  

यासंदर्भात विचारण्यात आले असता  अमिताभ पुढे म्हणाले, "पुरग्रस्तांना मदत करण्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील केली आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांना कशाप्रकारे आवाहन करता येईल याबाबत देखील आमचे बोलणे झाले आहे.''

बॉलिवूड कलाकारांनी पुरग्रस्तांकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत असतानाच अमिताभ यांनी पुरग्रस्तांना मदत करणार असल्याचे जाहिर केले. तर दुसरीकडे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुखनेही पुरग्रस्तांना 25 लाख रुपयांची मदत केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख