रामराजेंनाही म्हणावे लागले...आम्ही उदयनराजेंचे चाहते!

रामराजेंनाही म्हणावे लागले...आम्ही उदयनराजेंचे चाहते!

कऱ्हाड : 'तुम्ही एकटेच उदयनराजे यांचे चाहते नाहीत, तर आम्हीही उदयनराजेंचे चाहते आहोत, त्यामुळे तुम्ही जरा शांतच राहिलेलं बरं', अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना आपल्या भाषणाची सुरुवात करावी लागली.

साताऱ्याचे खासदार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या आघाडीच्या सभेला रामराजे निंबाळकर यांनी आवर्जून हजेरी लावली. मात्र काही उत्साही तरुणांनी उदयनराजे यांचा जयघोष सुरुच ठेवला. रामराजे यांचे भाषण सुरु झाल्यावर तर हा जयघोष आणखीच वाढला. त्यामुळे रामराजे यांना आम्हीही उदयनराजे यांचे चाहते आहोत, असे भाषणाच्या सुरुवातीला सांगावे लागले.

रामराजे म्हणाले, 'उदयनराजेंची जी स्टाईल आहे, त्यामुळे उदयनराजेंची क्रेझ कायम टिकलेली आहे, याचा मलाही मनापासून आनंद आहे. माझा मतदारसंघ माढा असल्याने यावर मी जास्त काही बोलून तरुण मंडळींचा वेळ घेऊ इच्छित नाही. उदयनराजे मागच्या वेळीपेक्षा जास्त लिडने निवडून येतील, अशी आशा बाळगतो'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com