पिंपरीचे पाणी पेटले राष्ट्रवादीही मैदानात

पिंपरीचे पाणी पेटले राष्ट्रवादीही मैदानात

पिंपरीः दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या विरोधात १२८ सदस्यसंख्येच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकही नगरसेवक नसलेल्या कॉंग्रेसने आणि फक्त एकच सदस्य असलेल्या मनसेने सोमवारी (ता.२) धडक मोर्चा काढत रिकामे माठ फोडले.

त्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीला आज बुधवारी उशीरा जाग आली. त्यांनी पालिकेसमोर पाणीकपातीविरोधात घंटानाद केला.आता शिवसेना कधी याविरोधात आंदोलन करते,याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

गटनेत्यांच्या बैठकीत मनसेचा विरोध डावलून सत्ताधारी भाजपने शहरात २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. शहराला पाणीपुरवठा होणारे पवना धरण शंभर टक्के भरूनही पाणीकपात केल्याने त्याचे तीव्र पडसाद सर्व स्तरावर शहरात उमटले. टॅंकर लॉबीच्या भल्यासाठी हा निर्णय़ घेतल्याचा आरोप झाला. सोमवारी कॉंग्रेसने पालिकेवर धडक मोर्चा काढला.

तर मनसेने पालिकेत माठ फोडो आंदोलन केले होते. मात्र ३६ आणि नऊ नगरसेवक असलेली राष्ट्रवादी व शिवसेना या गंभीर व ज्लवंत प्रश्नी गप्पच राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. त्यामुळे आज राष्ट्रवादीने पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर घंदानाद आंदोलन केले. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे टँकर लॉबीच्या भल्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

 त्यामुळे झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी घंटानाद करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. एका आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत झाला  नाही,तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला गेला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com