अकोल्यातील जलसंधारणाच्या कामाची विदेशात प्रशंसा

गावात सुरू असलेल्या या कामांची माहिती जपानमधील टोकियो येथे वास्तव्यास असलेल्या मोहन भटकर यांना समजली. आपलाही या लोकसहभागाच्या कार्यात हातभार लागावा या हेतूने त्यांनी मदत देण्याचे निश्चित केले. सहज बोलता बोलता त्यांनी ही माहिती जपानी मित्र मंडळाला दिली. मित्रांनीही या सत्कार्यात अर्थसहाय्य देण्याची इच्छा व्यक्त केली.
अकोल्यातील जलसंधारणाच्या कामाची विदेशात प्रशंसा

अकोला - अकोला गावातील पाणी टंचाई दूर होण्यासाठी सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामासाठी जपान मध्ये राहणाऱ्या कुटुंबाने पाच लाखाची मदत जपानी मित्र मंडळाच्या सहकार्याने पाठवली. या माध्यमातून राज्यातील देशातील पाणीटंचाई निवारणासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची चर्चा विदेशात रंगली आहे.

तालुक्यातील कान्हेरी सरप येथे जलस्त्रोत बळकटीकरणाची कामे मागील दोन महिन्यापासून सुरू आहेत. यामध्ये नाला खोलीकरण, शोषखड्डे, गाळ काढणे, सीसीटी बंधारे यासारखी विविध कामे सुरू झाली आहेत. गावात सुरू असलेल्या या कामांची माहिती जपानमधील टोकियो येथे वास्तव्यास असलेल्या मोहन भटकर यांना समजली.
आपलाही या लोकसहभागाच्या कार्यात हातभार लागावा या हेतूने त्यांनी मदत देण्याचे निश्चित केले. सहज बोलता बोलता त्यांनी ही माहिती जपानी मित्र मंडळाला दिली. मित्रांनीही या सत्कार्यात अर्थसहाय्य देण्याची इच्छा व्यक्त केली.

सर्व मिळून गोळा झालेली ५ लाखाची रक्कम मग भटकर यांनी गावकऱ्यांना पाठवून दिली. जलसंधारणाच्या कामासाठी अर्थसहाय्य करणारे भूमिपुत्र मोहन भटकर यांच्यासह जपानी मित्र ताजिमा हितोमी, नोकोता सुषम, तानिआची अकिमो यांचे गावकऱ्यांनी आभार मानले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com