राज ठाकरेंकडून हीच अपेक्षा होती -इम्तियाज जलील

७८ डॉलर बॅरलपर्यंत क्रूड ऑइलचे भाव गेले होते. आज जागतिक कोरोनाच्या संकटामुळे ते शून्यावर आले आहेत. मग हा झालेला नफा ज्या राज्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे ती सुधारण्यासाठी का वापरला जात नाही? असा सवालही इम्तियाज यांनी केला.
raj thackray imtiaz news
raj thackray imtiaz news

औरंगाबाद:  राज्य सरकार कोरोनासोबतच आर्थिक संकटाच्या कात्रीत सापडले आहे. त्यामुळे सर्वाधिक महसूल देणाऱ्या दारूविक्रीला परवानगी देण्याचा विचार सुरु आहे. पण यामागे लिकर लॉबी आणि बेवडे यांचा सरकारवर दबाव आहे, या मतावर मी ठाम आहे.  राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिके बद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, त्यांच्याकडून अशीच भूमिका घेणे अपेक्षित होते, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.

राज्यातील नागरिकांचे अन्नपाण्यावाचून होणारे हाल आणि गैरसोय पाहता पार्सल व्यवस्था पुरवणाऱ्या हॉटेल तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या राज्याला महसूल मिळावा म्हणून सुरक्षितता अंतराचे नियम पाळत दार विक्रीला परवानगी द्या, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

औरंगाबादचे खासदार  इम्तियाज जलील यांनी सद्यस्थितीत राज्यातील दारूविक्रीला तीव्र विरोध दर्शवला आहे. औरंगाबादेत आपण या निर्णयाची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असा इशारा देत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

 या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, राज ठाकरे यांच्या या मागणीमुळे त्यांची मानसिकता लक्षात येते,  त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाही केली जाऊ शकत नाही. राज्य आणि देश आज कुठल्या संकटाशी लढतो आहे आणि आपण कोणत्या मागण्यांसाठी पाठपुरावा करतोय याचे भान नसण्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.

आर्थिक संकटात सापडलेल्या राज्याला दारूविक्रीच्या महसूलातूनच तारता येणार आहे का? आज क्रूड ऑइलचे दर शून्यावर आले आहेत, पण याचा लाभ  देशातील सर्वसामान्य नागरिकांना न होऊ देता, तो सरकार आपल्या तिजोरीत जमा करत आहे. याबद्दल केंद्राला किंवा राज्याला जाब कोणी का विचारत नाही?

  ७८  डॉलर बॅरलपर्यंत क्रूड ऑइलचे भाव गेले होते. आज जागतिक कोरोनाच्या संकटामुळे ते शून्यावर आले आहेत. मग हा झालेला नफा ज्या राज्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे ती सुधारण्यासाठी का वापरला जात नाही? असा सवालही इम्तियाज यांनी केला. राज्यात दारूविक्री सुरू व्हावी यासाठी लिकर लॉबी आणि बेवड्यांचा सरकारवर दबाव आहे हेच या मागणीतून सिद्ध होत आहे, असा दावा देखील इमतियाज जलील यांनी केला.

 

 

   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com