warish pathan makes | Sarkarnama

वारीस पठाण यांच वादग्रस्त विधान : आम्ही पंधरा कोटी पण शंभर कोटींना भारी!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

...

नवी दिल्ली : ``आपण पंधरा कोटी आहोत; पण शंभर कोटीला भारी आहोत हे लक्षात ठेवा. विटेला दगडाने उत्तर द्यायला आपण शिकलो आहोत. मात्र आपण एक झालं पाहिजे,"असं विधान एमआयएमचे नेते वारीश पठाण यांनी केले आहे.

कर्नाटकातील एका सभेत बोलताना  वारीस यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वेळी एमआयएमचे नेते असुदिद्दीन ओवेसी व्यासपीठावर उपस्थित होते. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात मुस्लिम महिला नवी दिल्लीतील शाहीन बाग येथे गेले दोन महिने येथे आंदोलन करीत आहेत. त्यावरून बोलताना वारीस यांनी हे वक्तव्य केले. या आंदोलनावरून दिल्लीतील वातावरण तापले आहे. सर्वोच्च न्यायालय यावर आता तोडगा काढत आहे. त्यात वारीस यांच्या या विधानाची भर पडली आहे. 

"स्वातंत्र्य आमचा अधिकार आहे,आम्ही मागतोय आणि ते मिळालं नाही तर आम्ही हिसकावून घेवू असही त्यानी म्हंटल आहे. एएन य या वृत्तवाहीनीने त्यांच्या ट्विटवर पठाण यांचा व्हिडीओ अपलोड केला आहे.
"आमच्या स्त्रिया लढाई देत आहेत. त्या वाघिणी आहेत. त्यांना पाहूनच तुम्हाला घाम फुटला आहे. मग आम्ही आलो तर काय होईल,"असेही आव्हान पठाण यांनी दिलं आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख