धोटेंच्या आमदारकीला चटपांचे आव्हान; न्यायालयात याचिका दाखल

विधानसभा निवडणुकीत समोरासमोर आलेले आमदार सुभाष धोटे आणि माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्यात पुन्हा सामान रंगणार आहे. यावेळी निवडणुकीच्या मैदानाऐवजी न्यायालयाचे रणांगण असेल. अॅड. चटप यांनी आमदार धोटे यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे
Wanarao Chatap files writ Against Mla Subhash Dhote
Wanarao Chatap files writ Against Mla Subhash Dhote

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत समोरासमोर आलेले आमदार सुभाष धोटे आणि माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्यात पुन्हा सामान रंगणार आहे. यावेळी निवडणुकीच्या मैदानाऐवजी न्यायालयाचे रणांगण असेल. अॅड. चटप यांनी आमदार धोटे यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष धोटे यांनी अॅड. वामनराव चटप यांचा दोन हजार मतांनी पराभव केला. तत्पूर्वी धोटे संस्था अध्यक्ष असलेल्या शाळेत लैंगिक अत्याचाराचे प्रकरण झाले होते. या प्रकरणात त्यांच्या अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. मात्र आमदार धोटे यांनी नामांकन अर्ज दाखल करताना देण्यात येणाऱ्या शपथपत्रात या ऍट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्हे लपविण्यात आले होते. त्याऐवजी भारतीय दंड संहितेचे गुन्हे दाखविण्यात आले आहेत. वर्तमानपत्रातील जाहीरांतीमध्येही हे गुन्हे लपविण्यात आले, असा अॅड. चटप यांचा दावा आहे.

याचाच आधार घेत अॅड. चटप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमुर्ती जोशी यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजुरा मतदार संघात 23 टक्के अनुसूचित जमातीचे मतदार आहे. या प्रवर्गातील मतदार प्रभावित होऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक ऍट्रासिटीचे गुन्हे धोटे यांनी लपविले. ही मतदारांची फसवणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 13 मार्च ला होईल. या याचिकेच्या निमित्ताने आमदार धोटे आणि अॅड. चटप यांच्यातील सामान न्यायालयात पुन्हा रंगणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com