Waluj MIDC will be provided special protection : Subhash Desai | Sarkarnama

वाळूज औद्योगिक विकास वसाहतीला विशेष सुरक्षा : सुभाष देसाई 

सरकारनामा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

औरंगाबाद शहरालगतच्या वाळूज येथील औद्योगिक विकास वसाहतीच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.  
 

मुंबई  : औरंगाबाद शहरालगतच्या वाळूज येथील औद्योगिक विकास वसाहतीच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.  
 

वाळूज एम.आय.डी.सी. मध्ये हिंसाचार उसळल्याने अनेक उद्योगाचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील उद्योजक तसेच सी.आय.आय. च्या प्रतिनिधींनी उद्योगमंत्री श्री.देसाई यांची मंत्रालय येथे भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, महासंचालक (कायदा व सुवस्था) परमबीर सिंह, औरंगाबादचे पोलीस आयुक्त सी. प्रसाद, कॅम्पॅक कंपनीचे एच. व्ही. जाजू, स्टेरलाईट कंपनीचे के. एस. राव आदी उद्योजक उपस्थित होते.

भविष्यात औद्योगिक वसाहतीमध्ये हिंसाचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी खबरदाराची उपाय म्हणून उद्योजकांनी काही सूचना केल्या. त्यामध्ये संरक्षक भिंतीची उंची वाढविणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच एमआयडीसीतील रस्त्यांची रुंदी वाढविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिले.
 

ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयामध्ये भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. ऑटोमोबाईल कंपन्यांना मिळणारा प्रोत्साहन निधी, जीएस टी. आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सतीश गवई, फोक्स वॅगन कंपनीचे प्रतिनिधी जयेश सुळे, टाटा मोटर्सचे प्रतिनिधी सिद्धार्थ बक्षी, फियाट कंपनीचे प्रतिनिधी दिपक भारद्वाज आदी कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळस उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख