वळसे पाटलांची कामे मुख्यमंत्री मार्गी लावणार! 

राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव - शिरुर मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी श्री. वळसे पाटील यांनी सुचवलेली कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
वळसे पाटलांची कामे मुख्यमंत्री मार्गी लावणार! 
वळसे पाटलांची कामे मुख्यमंत्री मार्गी लावणार! 

पारगाव : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव - शिरुर मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी श्री. वळसे पाटील यांनी सुचवलेली कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. 

या बैठकीत प्रामुख्याने आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील पांडवदरा पाझर तलावाची प्रशासकीय मान्यता पुनर्जीवित करावी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत नवीन रस्ते घेणे,आदिवासी भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देणे, आसाणे येथील लघु पाटबंधारे तलावाच्या कामास निधी उपलब्ध करून काम लवकरात लवकर सुरू करणे, 
बिगर आदिवासी भागातील रस्त्यांसाठी रस्ते दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून देणे, डिंभे धरण दुरुस्ती व डावा कालवा सुधारणा करणेसाठी निधी मिळावा, 
अशा विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली. यावर सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com