जलसिंचन विभागाच्या मुख्य लेखा परीक्षक कार्यालयाचे स्थलांतर टळले

जलसिंचन विभागाच्या मुख्य लेखा परीक्षक कार्यालयाचे स्थलांतर टळले

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्याचे मुख्य लेखा परिक्षक, जल व सिंचन मुख्य कार्यालय औरंगाबाद येथेच कार्यरत ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे कार्यालय पुण्यात स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न केले जात होते. याला विरोध दर्शवत या कार्यालयाच्या स्थलांतर प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली होती. अखेर त्याची दखल घेत प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हे कार्यालय वाल्मी औरंगाबाद येथेच कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुख्य लेखा परिक्षक, जल व सिंचन, महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय कार्यालयाची स्थापना औरंगाबाद येथे 1 एप्रिल 2006 रोजी झाली. या कार्यालयात संपूर्ण राज्याचे जलसिंचनाचे लेखा परिक्षण केले जाते. औरंगाबाद हे राज्याचे मध्यवर्ती ठिकाण असून त्यासाठी राज्यातल्या जल सिंचनाच्या लेखा परिक्षणासाठी सर्व संबंधीत कार्यालयास औरंगाबाद हे ठिकाण योग्य व्हावे हा शासनाचा सदरील कार्यालय स्थापनेबाबत मुळ हेतू होता. 

मात्र राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाने 23 मे 2018 रोजी आयुक्त, मृद व जलसंधारण, वाल्मी, औरंगाबाद व महासंचालक, वाल्मी औरंगाबाद यांना पत्राव्दारे औरंगाबाद येथील मुख्य लेखा परिक्षक, जल व सिंचन कार्यालय वाल्मी संस्थेच्या प्रशासकीय इमारतीच्या एल-1 या विंगमधून मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आर-5 या विंगमध्ये तात्काळ स्थलांतर करण्याविषयी कार्यवाही करण्याचे कळविले होते. स्थलांतराचा हा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा अशी मागणी सतीश चव्हाण यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली होती. 

मुख्य लेखा परिक्षक, जल व सिंचन हे कार्यालय प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने वाल्मी औरंगाबाद येथेच कार्यरत ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अवर सचिवांनी पत्राव्दारे कळविले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com