walase patil should contest loksabha : CM | Sarkarnama

वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी : मुख्यमंत्र्यांची सूचना

गणेश कोरे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे : दिलीप वळसे पाटील यांची राष्ट्रीय सहकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, त्यामुळे त्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवावी, असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आज ही संधी साधली. या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या चिमट्यामागील पार्श्वभूमी सर्वांनाच माहिती असल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर त्यामुळे हास्याचे लकेर उमटली.

वळसे पाटील यांची सहकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा सत्कार सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी काॅमेंट केली. राष्ट्रीय साखऱ संघाची जबाबदारी मिळाल्याने त्यांनी राष्ट्रीय राजकारणात यावे, असे या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी सुचविले. वळसे पाटलांनीही त्यावर हसून दाद दिली. मुख्यमंत्र्यांची सूचना वळसे पाटील मनावर घेणार का, याची उत्सुकता असल्याने मतदारसंघात याविषयी लगेच चर्चा सुरू झाली.

राष्ट्रवादी काॅंग्रेसला शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात सक्षम उमेदवार मिळत नसल्याची खंत आहे. वळसे पाटील यांचा राष्ट्रवादीला योग्य पर्याय वाटतो. पण ते लोकसभेत जायला नाखूष असल्याने ते या पर्यायाला नकार देतात.  अजित पवार यांनीही 2009 च्या निवडणुकीच्या वेळी वळसे पाटलांनी लोकसभेसाठी उभे राहावे, यासाठी प्रयत्न केला होता. मात्र शरद पवार यांनी त्या वेळी वळसे पाटलांचा विधानसभेवरच जाण्याचा हट्ट पूर्ण केला. राष्ट्रवादी काॅंग्रेसचा शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आठ दिवसांत जाहीर करण्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी दहा दिवसांपूर्वी सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या मुखातून तर राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाला नाही ना, अशी चर्चा त्यामुळे रंगली आहे. 

वळसे पाटलांनी नकार दिला तर माजी आमदार विलास लांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, देवदत्त निकम आणि मंगलदास बांदल यांच्या नावांवर राष्ट्रवादीत चर्चा असल्याचे समजते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख