बाणखेले फक्त टीका करणार, मतदार मला विक्रमी मतांनी निवडून देणार : वळसे पाटील

बाणखेले फक्त टीका करणार, मतदार मला विक्रमी मतांनी निवडून देणार : वळसे पाटील

टाकळी हाजी : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिरूरची 39 गावे समावेश झाल्यापासून या मतदारांसाठी काम करत आहे. शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांच्याकडे विकासकामांचे सांगण्यासारखे काही नाही. काय करणार हे देखील सांगता येत नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.

खालच्या पातळीवर माझी निंदा करून मतदारांना भुलविले जात आहे. या भागात विकासकामांचा महामेरू उभा करत असताना या मतदारांनी मला साथ दिली. या पुढील काळात अनेक विकासकामे उभे करण्यासाठी हिच जनता या निवडणूकीत विक्रमी मतांनी मला निवडून देईल. यात मला शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सविंदणे, कवठे येमाई, मलठण, मिडगुलवाडी, आमदाबाद येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, प्रदिप वळसे पाटील, सुनीता गावडे, अरूणा घोडे, राजेंद्र गावडे, वसंत पडवळ, सुदाम इचके, दामु घोडे, दिपक रत्नपारखी, योगेश थोरात, बाळासाहेब डांगे, संदिप गायकवाड, बबनराव पोकळे आदि ग्रामस्थ उपस्थीत होते.

वळसे पाटील म्हणाले की,या परीसरात आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात म्हणून मलठण व पाबळ येथे ग्रामीण रूग्णालय मंजूर करून आणली. कवठे येमाई, कान्हूर मेसाई येथे विजेचे सबस्टेशन मंजूर करून सुरू केले. विकास कामे करतो म्हणून विरोध करता त्यापेक्षा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्योगपती असताना या भागात प्रकल्प का काढला नाही? वेगवेगळ्या संस्था काढल्या म्हणून येथील तरूणांच्या हाताला काम मिळू लागले आहे.

आमच्या कार्यकर्त्यांनी जवळपास सहा हजार तरूणांना काम मिळवून दिले. अष्टविनायक रस्ता प्रत्साव मंजूर करून घेतला याचा विसर पडला असेन. कवठे येमाई येथील रयत शिक्षण संस्थेची शाळा उभी केली. दुष्काळ पडला त्यावेळी शेतकरी अडचणीत असताना कुठे लपून बसले होते. चारा छावणी व पाण्यासाठी एकही नेता पुढे आला नाही. गलिच्छ राजकारण करत असताना चुकिच्या वल्गना करू नका. पुढील काळात अनेक विकास कामे करावयाची असून मतदारांनी विक्रमी मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com