सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरूणांनो पेटून उठा : सुभाष देशमुख

ओघवत्या शैलीत मुलांशी संवाद साधताना सहकारमंत्री देशमुख यांनी आपण बदलापूर येथील पोल्ट्रीमध्ये, नंतरच्या काळात ठेकेदारीमध्ये केलेल्या कामाचा व आलेल्या अनुभवांचे कथन विद्यार्थ्यांसमोर केले. मुलगा रोहन यालाही आपण परदेशात पेट्रोल पंपावर काम करण्यास व सोलापुरातील सोमाणी उद्योगात माझी ओळख लपवून काम करण्यास सांगितल्याचा किस्सा सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितला.
सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरूणांनो पेटून उठा : सुभाष देशमुख

सोलापूर : मुलींनो जोडीदार म्हणून नोकरदारच हवा हा हट्ट सोडा. ज्या ठिकाणी लाथ मारेल त्या ठिकाणी पाणी काढणारा धमक असलेल्या युवकाची जोडीदार म्हणून निवड करा. धाडस दाखविल्या शिवाय आणि वेगळे करून चमत्कार दाखविल्याशिवाय जग नमस्कार करत नाही. सोलापूर आणि ग्रामदैवत सिद्धेश्‍वराच्या तुलनेत शिर्डी आणि साईबाबा देवस्थान खूप अलीकडचे आहे. शिर्डीचा विकास झाला मग सोलापूरचा का नाही? असा सवाल करत सोलापूरच्या उज्वल भविष्यासाठी तरुणांनो पेटून उठा असा सल्ला राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज सोलापूरच्या तरुणाईला दिला.

 
डिलेव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-"यिन'च्यावतीने सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आजपासून सुरू झालेल्या यिन समर युथ समिटच्या उद्‌घाटनप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलत होते. याप्रसंगी सकाळच्या सोलापूर आवृत्तीचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गणेश मंझा, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील, आर. सी. सावळजकर, सकाळच्या कम्युनिटी नेटवर्कचे चीफ मॅनेजर तेजस गुजराथी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 ``तुम्ही आता 18 वर्षांचे झाला आहात. तुमच्या शिक्षणाचा खर्च असो की पॉकेटमनी कोणत्याच गोष्टीसाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊ नका. तुमचा खर्च तुम्हीच भागवा. आतापासूनच पैसा कमवायचे कौशल्य शिकून घ्या असा सल्लाही सहकारमंत्री देशमुख यांनी दिला.

ओघवत्या शैलीत मुलांशी संवाद साधताना सहकारमंत्री देशमुख यांनी आपण बदलापूर येथील पोल्ट्रीमध्ये, नंतरच्या काळात ठेकेदारीमध्ये केलेल्या कामाचा व आलेल्या अनुभवांचे कथन विद्यार्थ्यांसमोर केले. मुलगा रोहन यालाही आपण परदेशात पेट्रोल पंपावर काम करण्यास व सोलापुरातील सोमाणी उद्योगात माझी ओळख लपवून काम करण्यास सांगितल्याचा किस्सा सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितला. 


यावेळी स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक पाटील, सकाळचे सहयोगी संपादक दिवाणजी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व आभार सकाळ कम्युनिटी नेटवर्कचे चीफ मॅनेजर गुजराथी यांनी केले. सूत्रसंचालन धनराज मदगोंड यांनी केले. 

"यिन समर युथ समिट' मधून सकारात्मक ऊर्जा 

महिला, युवक, जलसंधारण अशा विविध समाज घटक व सामाजिक प्रश्‍नांवर सकाळ माध्यमसमूह सातत्याने कृतिशील प्रयत्न करत आहे. "यिन समर युथ समिट' मधून तरुणांना निश्‍चित प्रेरणा मिळेल. या प्रेरणेतून सकारात्मक ऊर्जा तयार होईल. ही ऊर्जा तरुणाईला आयुष्यभरासाठी उपयोगी पडेल असा विश्‍वास सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी व्यक्त केला.

कोणासोबत तुलना करू नका, प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात तरुणाईला आपली संस्कृती जोपासण्याचेही काम करावे लागेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com