राज्य सरकारची अधिसूचना निघेपर्यंत दुकाने सुरू करू नयेत : जिल्हाधिकारी 

राज्य सरकार अशा प्रकारची अधिसूचना काढत नाही, तोपर्यंत संचार बंदीच्या काळात सुरू असलेले नियम तसेच राहतील.
 wait for government orders kolhapur collector says to shop keepers
wait for government orders kolhapur collector says to shop keepers

कोल्हापूर : राज्य सरकारने अधिसूचना काढल्याशिवाय कोणीही अशा प्रकारच्या आस्थापना, दुकाने सुरू करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागात काही दुकाने, आस्थापना सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त अनेक ठिकाणी प्रसारित झाले आहे.

लॉक डाऊन च्या काळात काही प्रमाणात शिथिलता म्हणून काही दुकाने व कार्यालय सुरू करण्यात येत असल्याबाबत सोशल मीडियावर एक परिपत्रक आज सकाळपासून वेगाने फिरू लागले होते याच परिपत्रकाचा आधार घेऊन काही दुकाने आणि कार्यालय सुरू होण्याची शक्यता होती ही बाब जिल्हाधिकारी देसाई यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले जोपर्यंत राज्य सरकार कडून अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जात नाहीत तोपर्यंत कोणीही दुकाने किंवा कार्यालयात आपणास सुरू करू नयेत. राज्य सरकार अशा प्रकारची अधिसूचना काढत नाही, तोपर्यंत संचार बंदीच्या काळात सुरू असलेले नियम तसेच राहतील. याची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी केले.

अनेकांचे दारूचे व्यसन सुटले : रामदास आठवले 
मुंबई : कोरोनाला नष्ट करण्यासाठी लॉकडाऊन पाळणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद असल्याने अनेकांचे दारूचे व्यसन सुटले असल्याचा दावा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. यासंबंधाने "गावागावातील म्हणते पारू लॉकडाऊनमुळे माझ्या नवऱ्याची सुटली आहे दारू" अशी शीघ्र कविता केली आहे.

थोड्या महसुलासाठी लॉकडाऊनच्या काळात पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला तर कोट्यवधी लोकांच्या आनंदावर विरजण टाकणारा तो अन्यायकारक निर्णय असेल. त्यामुळे दारूची दुकाने लॉकडाऊनच्या काळात सुरू नयेत. त्यासाठीआठवले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत.  मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लॉकडाऊनच्या काळात महसूलवाढीसाठी दारूची दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी लॉक डाऊनच्या काळात दारूची दुकाने सुरू करण्यास तीव्र विरोध केला आहे.  लॉक डाऊनमध्ये दारू कुठेही मिळत नाही त्यामुळे अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे. त्यामुळे ज्यांचे दारूचे व्यसन सुटले त्यांच्या कुटुंबात आनंद आहे. आता पुन्हा लॉक डाऊनमध्ये जर दारूची दुकाने सुरू करण्याचा विचार राज्य शासनाने केला तर तो चुकिचा निर्णय ठरेल, असे आठवले यांनी संगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com