वाडी नगर परिषदेने `चोरले' नागपूर महापालिकेचे पाणी

शहरात तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देत असलेल्या महापालिकेच्या पाण्याचे पाणी वाडी नगर परिषदेने चोरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. महापालिकेच्या जलवाहिनीवर वाडी नगर परिषदेने केलेली अवैध जोडणी तोडण्यास महापालिकेचे पथक गेले असता वाडीतील जमावाने अधिकाऱ्यांना पळवून लावले. त्यामुळे आज उपमहापौर दीपराज पार्डीकर यांना पोलिस संरक्षणात अवैध जोडणी तोडण्याचे निर्देश दिले.
वाडी नगर परिषदेने `चोरले' नागपूर महापालिकेचे पाणी

नागपूर : शहरात तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देत असलेल्या महापालिकेच्या पाण्याचे पाणी वाडी नगर परिषदेने चोरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. महापालिकेच्या जलवाहिनीवर वाडी नगर परिषदेने केलेली अवैध जोडणी तोडण्यास महापालिकेचे पथक गेले असता वाडीतील जमावाने अधिकाऱ्यांना पळवून लावले. त्यामुळे आज उपमहापौर दीपराज पार्डीकर यांना पोलिस संरक्षणात अवैध जोडणी तोडण्याचे निर्देश दिले.

वाडी परिसरात महापालिकेची मुख्य जलवाहिनी असून त्यावर वाडी नगर परिषदेने अवैधरित्या पाइपलाइन जोडली. महापालिकेकडे पाणी घेण्याबाबत कुठलीही प्रक्रिया न करता गेल्या सात ते आठ दिवसांपासून वाडी नगर परिषद दररोज
साडेतीन लाख लिटर पाणी घेत आहे. अनधिकृतरित्या वाडी नगर परिषदेकडून घेण्यात येत असलेले पाणी हा चोरीचाच प्रकार असून उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अवैध जोडणी बंद करण्यासाठी महापालिकेचे पथक गेले होते, मात्र, वाडीतील जमावाने अधिकाऱ्यांना हाकलून
लावले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज महापालिकेत झालेल्या पाण्यासंदर्भातील बैठकीत दिली. यावर तातडीने पोलिस संरक्षण घेऊन कनेक्‍शन तोडण्याचे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि माजी महापौर प्रवीण दटके
यांनी दिले.

बैठकीला स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, माजी महापौर प्रवीण दटके, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, नगरसेवक भगवान मेंढे, मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्‍वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज
गणवीर, ओसीडब्ल्यूचे सीईओ संजय रॉय, एच. आर. व्यवस्थापक के. एम. पी. सिंग, श्री. कालरा, सहायक आयुक्त महेश धामेचा, गणेश राठोड, राजू भिवगडे, प्रकाश वऱ्हाडे, विजय हुमणे, अशोक पाटील, हरीश राऊत यांच्यासह मनपाच्या
जलप्रदाय विभागाचे आणि ओसीडब्ल्यूचे डेलिगेटस्‌ उपस्थित होते.

एकीकडे शहरात पाणी समस्येला तोंड देताना महापालिकेच्या नाकीनऊ आले आहे. पाणी चोरट्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे निर्देश आज उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. महापालिका अनधिकृत नळ जोडणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहे. त्यामुळे आता वाडी नगर परिषदेबाबत महापालिका काय भूमिका घेणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com