वाडीत वॉर्ड आरक्षणाचा दिग्गजांना बसणार फटका

नगरपरिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत सोमवारी (ता. 17) तहसील कार्यालयात काढण्यात आली. वाडी नगर परिषदेअंतर्गत एकूण वॉर्डांपैकी बरेच वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेकांची पंचाईत झाली. नगर परिषद हद्दीत नव्याने निर्मित वॉर्ड रचनेचाही फटका अनेक दिग्गजांना बसणार असल्याचे दिसतेय.
wadi council election reservation issue
wadi council election reservation issue

वाडी (नागपूर) ः नगरपरिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत सोमवारी (ता. 17) तहसील कार्यालयात काढण्यात आली. वाडी नगर परिषदेअंतर्गत एकूण वॉर्डांपैकी बरेच वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेकांची पंचाईत झाली. नगर परिषद हद्दीत नव्याने निर्मित वॉर्ड रचनेचाही फटका अनेक दिग्गजांना बसणार असल्याचे दिसतेय.

वाडी आंबेडकरनगर येथे अनुसूचित जातीची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही फक्त एकच अनुसूचित जाती महिला राखीव तर उर्वरित जागी इतर मागासवर्ग व खुला प्रवर्ग महिलेचे आरक्षण आले. एकूण पाच वॉर्डांपैकी चार महिला आरक्षित झाले. त्यामुळे इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले. नगर परिषद हद्दीत नव्याने निर्मित वॉर्ड रचनेचाही फटका अनेक दिग्गजांना बसणार असल्याचे दिसतेय. रिपाइं नेते दिनेश बन्सोड, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अश्विन बैस यांसारख्या मातब्बरांवर वाडीत कुठेही जागा आरक्षित न झाल्याने घरी बसण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांचा वॉर्ड ओबीसी महिला आरक्षित झाल्याने त्यांना इतरत्र निवडणूक लढावी लागणार आहे. त्यांच्या मते वॉर्ड हा त्यांच्यासाठी विषय नसून वाडीत कुठेही, कोणत्याही वॉर्डात निवडणूक लढण्याचा त्यांची तयारी आहे.

सर्वांत गंभीर स्थिती गजानन सोसायटीची झाली असल्याचे दिसून आले. पूर्वी एक वॉर्ड असलेला हा वॉर्ड नवीन रचनेत विभागल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष दिसून आला. या वॉर्डातही सोसायटी विभागल्याने पुढे विकासाची जबाबदारी कुणाची, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

वॉर्ड नंबर तीन या भागात वॉर्डात विभागला आहे. बसपचे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र मेंढे यांचा धम्मकीर्तीनगर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण झाल्यामुळे त्यांनासुद्धा दुसऱ्या वॉर्डाचा शोध घ्यावा लागणार आहे. शिवसेना नेते संजय अनासने यांनी वॉर्ड रचना योग्यप्रकारे झाल्याचे सांगितले. बसपचे प्रणय मेश्राम यांनी सांगितले की, नेतृत्व निर्माण करण्याचे काम थांबेल. या रोस्टर प्रणालीनुसार जास्त संख्येने अनुसूचित जाती व जमातीचे लोक वास्तव्यास असणाऱ्या वॉर्डाचे नेतृत्व इतर समाजाने प्रतिनिधी करतील, तर ते नुकसानदायक ठरू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com