wadar community reservation | Sarkarnama

आता वडार समाजाची आरक्षणाची मागणी

सुशांत सांगवे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

लातूर : आम्ही अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत आहोत. आम्हाला अद्याप आरक्षण मिळाले नाही. आता जर ते मिळाले नाही तर आम्हीही पेटून उठू, असा इशारा 'मी वडार महाराष्ट्राचा' या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी गुरुवारी दिला. 

लातूर : आम्ही अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत आहोत. आम्हाला अद्याप आरक्षण मिळाले नाही. आता जर ते मिळाले नाही तर आम्हीही पेटून उठू, असा इशारा 'मी वडार महाराष्ट्राचा' या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी गुरुवारी दिला. 

मराठा समाजानंतर धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मुस्लिम आणि लिंगायत समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यानंतर आता वडार समाजाने आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी लातुरातील मुक्ताई मंगल कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजिण्यात आहे. तो आज (ता. 3) सकाळी अकरा वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर चौगुले यांनी आपली भूमिका जाहीर केली.

चौगुले म्हणाले, आमचा समाज दगडं फोडणारा आहे. आमच्यात आक्रमकता भरपूर आहे; पण आम्ही शांत आहोत. आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केलात तर आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल. आतापर्यंत अनेक आयोग नेमले गेले. ते अर्धवट राहिले. विमुक्त जमातीतून आमचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा. आमच्या समाजात बेकारी वाढत आहे. हा चिंतेचा प्रश्न बनला आहे. हे सगळे विषय लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगितले जाणार आहेत. त्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेतला जाणार आहे.

या वेळी सुरेश धोत्रे, अनिल उधाळे, शिवाजी चव्हाण, शाम जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख